ओबीसी समाज राज्यभर आंदोलन करणार, जरांगेंनंतर ओबीसी समाजाचं वादळ येणार, नेमकी भानगड काय?
मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील भर उन्हात आमरण उपोषणासाठी बसले आहेत. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगेच्या भेटीला आले. राज्यात या जलद घडामोडी घडत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील भर उन्हात आमरण उपोषणासाठी बसले आहेत. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगेच्या भेटीला आले. राज्यात या जलद घडामोडी घडत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पुन्हा एकदा भर उन्हात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर राज्यभर ओबीसी समाज पेटून उठेल, असा स्पष्ट इशारा तायवाडे यांनी दिला आहे.
Published on: May 30, 2026 12:16 PM
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट

