AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Uncut | 7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल

Sanjay Raut Uncut | 7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल

| Updated on: May 30, 2026 | 12:21 PM
Share

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून तपासासाठी सीआयडीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून तपासासाठी सीआयडीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“पुण्यात विषारी दारू सहज उपलब्ध होत असेल तर अशा अवैध दारूच्या नेटवर्कचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात आहे,” असा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्री आता राज्यातील दारू नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची भाषा करत आहेत, मात्र हे नेटवर्क इतकी वर्षे कोणाच्या संरक्षणाखाली सुरू होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दारू विक्रेत्यांवर कारवाई होते, पण त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी काही लोकप्रतिनिधींचे अवैध धंद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांच्या “कोणालाही सोडू नका” या वक्तव्यावर उपरोधिक टीका करत राऊत म्हणाले, “सरकार प्रत्येक दुर्घटनेनंतर हेच सांगते, पण प्रत्यक्षात अवैध धंदे सुरूच राहतात.”
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

Published on: May 30, 2026 12:16 PM
Follow Us