AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : जे बुमराहला जमलं नाही ते महाराष्ट्राच्या प्रफुल हिंगेने पहिल्या बॉलवर वैभव सूर्यवंशीला कसं आऊट करुन दाखवलं?

Vaibhav Sooryavanshi : पाच सामन्यात 263.15 च्या सरासरीने वैभवने 200 धावा केल्या. आयपीएल 2026 मध्ये या फटकेबाजीने वैभव सूर्यवंशीने भल्या भल्या गोलंदाजांच्या मनात आपली दहशत निर्माण केलीय.

Vaibhav Sooryavanshi : जे बुमराहला जमलं नाही ते महाराष्ट्राच्या प्रफुल हिंगेने पहिल्या बॉलवर वैभव सूर्यवंशीला कसं आऊट करुन दाखवलं?
Vaibhav Sooryavanshi Image Credit source: PTI
| Updated on: Apr 14, 2026 | 2:00 PM
Share

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी सगळ्याच गोलंदाजांवर भारी पडतोय. जसप्रीत बुमराहपासून जॉश हेझलवूडपर्यंत कुठल्याही गोलंदाजाला वैभव सूर्यवंशीने सोडलेलं नाही. बुमराह, हेझलवूड हे वर्ल्ड क्लास बॉलर आहेत. अशा गोलंदाजांवर वैभव सूर्यवंशी तुटून पडतोय. त्यामुळे त्याला लवकरात लवकर भारतीय संघात घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मुंबई इंडियन्सचे हेड कोच माहेल जयवर्धने यांनी नुकताच खुलासा केला की, सूर्यवंशीचा धोका संपवण्यासाठी खास प्लानिंग केलेली. पण जसप्रीत बुमराहसारख्या जो टी20 मधील सर्वोत्तम बॉलर आहे, त्याला वैभव सूर्यवंशीने पहिल्या पाच चेंडूत दोन सिक्स मारले. त्यात एक सिक्स तर पहिल्याच चेंडूवर मारला. मी चेंडूवर जातो, बॉलरवर नाही या शब्दांमधून वैभवने एक क्रिकेटर म्हणून त्याची परिपक्व्ता दाखवून दिली.

जॉश हेझलवूडच्या एका ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीने 19 धावा लुटल्या. यात सलग चेंडूंवर तीन चौकार आणि एक सिक्स मारला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारला सलग दोन सिक्स मारले. पाच सामन्यात 263.15 च्या सरासरीने 200 धावा केल्या. आयपीएल 2026 मध्ये या फटकेबाजीने वैभव सूर्यवंशीने भल्या भल्या गोलंदाजांच्या मनात आपली दहशत निर्माण केलीय. वैभव सूर्यवंशी मोठ्या गोलंदाजावर तुटून पडतो ही त्याची खासियत. पण काल संध्याकाळी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध वैभव सूर्यवंशीला असं करणं जमलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. ते ही आयपीएल डेब्यू करणाऱ्या एका मराठमोळ्या बॉलरकडून. हे कसं शक्य झालं, ते समजून घ्या.

हे शक्य कसं झालं?

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. सूर्यवंशी पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्याच्या T20 क्रिकेट करिअरमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही पहिली वेळ आहे. पण हे शक्य कसं झालं?.

असा झाला आऊट

प्रफुल हिंगेने जे ठरवलेलं त्याची अचूकतेने अमलबजावणी केली. बॉलिंग कोच वरुण एरॉनसोबत हिंगेने प्लानिंग केलेली. प्रफुल हिंगेने काल राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये डेब्यु केला. पहिल्याच ओव्हरचा दुसरा चेंडू वैभव सूर्यवंशीला त्याने टाकला. त्याने बॅट्समनचा मिडल आणि पाय याच्या मधोमध चेंडू टाकला. सूर्यवंशीने पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॉलने बॅटची वरची कड घेतली आणि चेंडू विकेटकीपर सलील अरोराच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. सूर्यवंशीने एका सोपा झेल विकेटकिपरला दिला.

Follow Us
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....