पत्नीला छळायचा, सुनेलाही वाईट नजरेने पहायचा; अखेर संपूर्ण कुटुंबाने कट रचला अन्…

पती दररोज छळ करायचा. अनेक वर्षे सुरु असलेल्या या त्रासाला पत्नी अखेर कंटाळली. सुनेकडेही वाईट नजरेने पाहत होता. अखेर त्याच्या कृत्याला सर्वच जण कंटाळले अन् एक दिवस सर्वाचा अंत झाला.

पत्नीला छळायचा, सुनेलाही वाईट नजरेने पहायचा; अखेर संपूर्ण कुटुंबाने कट रचला अन्...
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा
Image Credit source: Google
| Updated on: Apr 19, 2023 | 7:40 PM

मुंगेली : पती गेल्या 30 वर्षापासून शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. सुनेवरही त्याची वाईट नजर होती. त्याला रोखल्यास पत्नीला मारहाण करायचा. अखेर त्याच्या या छळाला कंटाळून आई, मुलं आणि सुनेने मिळून त्याचा कायमचा काटा काढला. यानंतर मृतदेह कारमध्ये भरुन घरापासून दूर रस्त्यावर फेकला. शत्रुहन साहू असे मयत इसमाचे नाव आहे. शत्रुहन साहूवर अनेक गुन्हे दाखल आहेत. चिल्फी परिसराती तो कुख्यात गुंड होता. शत्रुहनच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी, दोन मुलगे, सून आणि मुलगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर पोलीस चौकशीसाठी शत्रुहनच्या घरी पोहचले आणि इथेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला.

पोलिसांना कारवर रक्ताचे डाग दिसल्याने हत्येचा उलगडा

पोलीस शत्रुहनच्या घरी चौकशीसाठी आले होते. यावेळी पोलिसांना घराबाहेर फावडा आणि कार धुवून स्वच्छ केलेले दिसले. मात्र कारवर पोलिसांना रक्ताचे डाग दिसले. हे पाहिल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली. चौकशीत मयताच्या पत्नीने सर्व सत्य कथन केले. मयत शत्रुहन गेल्या 30 वर्षापासून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. यानंतर मुलाचे लग्न झाल्यानंतर सुनेवरही त्याची वाईट नजर असायची. याला विरोध केल्यास तो पत्नीला मारहाण करायचा.

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मुलांच्या मदतीने काटा काढला

अखेर त्याच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून आई आणि मुलांनी मिळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून दूरवर नेऊन रस्त्याच्या कडेला फेकला. आरोपींनी गुन्हा कबूल करताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शत्रुहनची सून सहा महिन्यांची गरोदर आहे, तर छोटा मुलगा अल्पवयीन आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.