AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याला भावाचा काटा काढायचा होता, पण अंधारात नेम चुकला अन्…

भावांमध्ये दुकानाचा वाद होता. याच वादातून भावाने भावाचा काटा काढण्याचा कट रचला. मात्र रात्रीच्या अंधारात अंदाज चुकला आणि भलतंच घडलं.

त्याला भावाचा काटा काढायचा होता, पण अंधारात नेम चुकला अन्...
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 20, 2023 | 1:20 PM
Share

डुंगरपूर : दुकानावरुन दोन भावांमध्ये वाद होता. याच वादातून भावाने भावाचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने भावाला मारण्याचा कटही रचला. पण अंधारामुळे गफलत झाली आणि दुसऱ्याच तरुणाचा नाहक बळी गेला. भावाऐवजी त्याच्या मित्रालाच गोळी मारली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कनबा गावात 12 एप्रिल रोजी झालेल्या ब्लाइंड मर्डरचा खुलासा करण्यास पोलिसांना यश आले आहे. छगनलाल पटेल असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

रात्री शेतात पाणी द्यायला गेला होता

कनबा गावातील नागजी पटेल यांचा मुलगा छगनलाल 11 एप्रिल रोजी रात्री शेतात पिकांना देण्यासाठी गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. यानंतर नागजी पटेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

तपासादरम्यान पोलिसांना कनबा गावातील रहिवासी असलेल्या जीवनलाल याच्यावर संशय आला. पोलिसांनी जीवनलालला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच जीवनलालने हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

अंधारात भावाऐवजी छगन मारला गेला

जीवनलालचा त्याचा भाऊ कचरा पटेल याच्याशी कनबा येथे बांधलेल्या दुकानावरून वाद सुरू होता. छगनलाल हा त्याचा भाऊ कचरा याला भांडणात सहकार्य करत असे. याबाबत जीवनलाल याने अनेक वेळा पंच पटेलांकडे तक्रारही केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जीवनलाल 11 एप्रिल रोजी नवलश्याम मार्गावरून रात्री दुचाकीने गमदी आहाडाच्या दिशेने चालला होता. यादरम्यान एक व्यक्ती शेतातून प्लॉटकडे जाताना दिसला.

जीवनलालला वाटले की आपला भाऊ कचरा जात आहे. जीवनलालने पाठीमागून कृपाणी याच्याकडून त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली. पण नंतर कळलं की तो त्याचा भाऊ कचरा नसून छगन आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र अखेर त्याला पकडलेच.

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित