उसाच्या शेतातच भावाने भावाचा घात केला, कारण ऐकून पोलीसही हैराण झाले !

नेहमीप्रमाणे राजपाल हे उसाच्या शेतात गेले होते. संध्याकाळी त्यांचा शेट मृतदेह शेतात आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. तपासादरम्यान जे उघडकीस आले त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

उसाच्या शेतातच भावाने भावाचा घात केला, कारण ऐकून पोलीसही हैराण झाले !
जमिनीच्या वादातून भावाने भावाला संपवले
| Updated on: Jun 01, 2023 | 8:01 AM

बहादराबाद : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जमिनीचा वाद इतका टोकाला गेला की भाऊच भावाच्या जीवावर उठला. शेतकऱ्याच्या हत्येप्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. राजपाल असे मयत भावाचे नाव आहे. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुल दिली आहे. मयत राजपाल यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांचा लहान भाऊ आणि दोन पुतण्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच हत्येत वापरलेले शस्त्रही पोलिसांनी हस्तगत केले आहे.

भावा-भावांमध्ये जमिनीचा वाद होता

राजपाल यांचा लहान भाऊ बाल सिंह याच्यासोबत जमिनीवरुन वाद होता. या वादातून लहान भावाने सोमवारी दुपारी उसाच्या शेतात भावाची हत्या केली. यानंतर मृतदेह शेतात टाकून पसार झाला. यानंतर रात्रीच्या सुमारास उसाच्या शेतात राजपालचा मृतदेह आढळून आला. उन्हामुळे शरीर पूर्ण काळवंडले होते. दोन्ही हात तोडले होते. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली होती. यानंतर पोलिसांनी मोबाईल फोन सर्विलान्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. आरोपीचे नाव उघड होताच सर्वांनाच धक्का बसला. पोलीस चौकशीत हत्येचे कारण उलगडत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे.