Youtube : 144 कोटी व्हूअरशिप असलेल्या 8 युट्युब चॅनलवर बंदी! राष्ट्रविरोधी खोट्या बातम्या प्रसारीत केल्याचा ठपका

| Updated on: Aug 18, 2022 | 12:32 PM

Action Against Fake News : आठपैकी सात युट्युब चॅनेल हे भारतातूनच चालवले जात होते, अशीही माहिती समोर आली आहे. तर एक युट्युब चॅनेल हे पाकिस्तानमधून चालवलं जात होतं.

Youtube : 144 कोटी व्हूअरशिप असलेल्या 8 युट्युब चॅनलवर बंदी! राष्ट्रविरोधी खोट्या बातम्या प्रसारीत केल्याचा ठपका
मोठी कारवाई..
Image Credit source: Twitter
Follow us on

एकूण आठ युट्यूब चॅनेल्सवर (You Tube Channel) केंद्र सरकारने (Central Government) बंदी घातली आहे. तब्बल 144 कोटी युट्यूब व्हूव्हरशिप असलेल्या या युट्युब चॅनेलवर केंद्रीस माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कारवाई केली आहे. सरकारविरोधात खोट्या बातम्या प्रसारीत केल्याचा ठपका ठेवत या युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. आठपैकी सात युट्युब चॅनेल हे भारतातूनच चालवले जात होते, अशीही माहिती समोर आली आहे. तर एक चॅनेल हे पाकिस्तानमधून चालवलं जात होतं, असं सांगण्यात आलं आहे. भारताविरोधी खोट्या बातम्या (Fake News) प्रसारीत करुन या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पैसे कमावले जात होते, असा ठपका ठेवत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. याआधीही अशाच प्रकारे युट्युबवरुन खोट्या बातम्या आणि माहिती पसरवणाऱ्या युट्युब चॅनेलवर कारवाई करण्यात आली होती.

News Ki Duniya (न्यूज की दुनिया) हे न्यूज चॅनेल पाकिस्तानमधून चालवलं जात होतं. या चॅनेलला 97 हजार लोकांनी सबस्क्राईब केलेलं बोतं. राष्ट्रविरोधी खोट्या बातम्या पसरवणं, भारतीय संस्कृतीवर आक्षेपार्ह कंटेट प्रसारीत करणं, असा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. यात भारतीय सैन्यासोबत, जम्मू काश्मीर आणि भारतीय सरकारविरोधात चुकीच्या गोष्टी प्रसारीत केल्याचं तपासात दिसून आलं होतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

बॅन केलेल्या चॅनल्समध्ये कुणाकुणाचा समावेश

  1. लोकतंत्र टीव्ही –
    Views: 23,72,27,331
    Subscribers: 12.9 lakh
  2. यू एन्ड ए टीव्ही
    Views: 14,40,03,291
    Subscribers: 10.2 lakh
  3. ए एम रझवी
    Views: 1,22,78,194
    Subscribers: 95,900
  4. गौरवशाली पवन मिथिलांचल
    Views: 15,99,32,594
    Subscribers: 7 lakh
  5. सी टॉप पाईव्ह टीएच
    Views: 24,83,64,997
    Subscribers: 33.5 lakh
  6. सरकारी अपडेट
    Views: 70,41,723
    Subscribers: 80,900
  7. सब कुछ देखो
    Views: 32,86,03,227
    Subscribers: 19.4 lakh
  8. न्यूज की दुनिया
    Views: 61,69,439
    Subscribers: 97,000

बॅन करण्यात आल्लया सी टॉप पाईव्ह टीएच या युट्युब चॅनेलचे सर्वाधिक सबस्क्राईबर्स होते. तब्बल 33. 5 इतके युट्यु सबस्क्राईबर्स आणि 23 कोटी 83 लाखपेक्षा जास्त व्हूवर्स असलेल्या या युट्युब चॅनेलवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईमुळे युट्युबवर खोटी माहिती पसरवणाऱ्यांना मोठा दणका बसलाय.