Jalgaon Murder : दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया रे, मित्राला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून बाहदर पोहोचले पोलिसांत, CCTV ने फोडलं बिंग

सुरूवातील तर ही हत्या नसून हा अपघात आहे असे भासवण्यात आले. मात्र पोलिसांनी या प्रकरणात एन्ट्री घेतली आणि या लबाडांचा प्लॅन विस्कटला. शेवटी पोलिसांनी (Jalgaon Police) तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हाचा आधार घेत या प्रकरणाचा छडा लावला.

Jalgaon Murder : दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया रे, मित्राला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून बाहदर पोहोचले पोलिसांत, CCTV ने फोडलं बिंग
मित्राला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून बाहदर पोहोचले पोलिसांत, CCTV ने फोडलं बिंगImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 3:59 PM

मुंबई : असं बोलतात की रक्ताची नाती ही आपल्याला नशिबाने मिळतात मात्र यार दोस्त (Friends) आपण निवडतो. ज्या गोष्टी आपण कुणालाही बोलत नाही अशा गोष्टी आपण मित्राला बोलतो. यारी हे दुनियातलं बेस्ट नातं मानलं जातं. मात्र याच यारी दोस्तीला काळीमा फासणारी एक घटना जळगावात (Jalgaon Murder) घडलीय. कारण जळगावात एक तरुणाची हत्या झाली. आणि हत्या करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे मित्रच आहेत. सुरूवातील तर ही हत्या नसून हा अपघात आहे असे भासवण्यात आले. मात्र पोलिसांनी या प्रकरणात एन्ट्री घेतली आणि या लबाडांचा प्लॅन विस्कटला. शेवटी पोलिसांनी (Jalgaon Police) तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हाचा आधार घेत या प्रकरणाचा छडा लावला. त्यावेळी सर्वांना एक धक्का बसला. कारण समोर आलेलं सत्य हे अनेकांचे डोळे उघडणारे होते.

नेमका प्रकार काय घडला?

जळगावात गोलानी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मुकेश रमेश राजपूत या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान मुकेशचा मृत्यू हा इमारतीवरून पडून नव्हे तर दोन मित्रांनी ढकलून त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे यासह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे.

हत्या का केली?

मृत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर काम करत होता सोमवारी काम आटपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. तर में अमर उर्फ लखन बारोट व पराग उर्फ बबलू आरखे या दोघांनी मुकेशला पार्टी करायचे सांगत गोलानी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर नेले. या ठिकाणी दारू पीत असताना अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. या वादातून दोन्ही मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली. घटनेनंतर अमर उर्फ लखन व पराग उर्फ बबलू हे दोघे पोलीस स्टेशनला जाऊन मुकेश वरून पडल्याची बतावणी करत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत परिसरातील सीसीटीव्ही ची पाहणी केली असता मुकेश ला वरून ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार याच समोर आला. यावरून पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या दोघांना अटक केली असून त्यांचा सहकारी निखिल राजेश सोनवणे यास देखील पोलिसांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.