बॉयफ्रेंडच बोट कापलं, दारुत बुडवून फ्रिजमध्ये ठेवलं, खतरनाक गर्लफ्रेंडची गोष्ट

रिपोर्टनुसार, 2023 मध्ये पीडित 19 वर्षांचा होता. त्याने सातोचे काही ऑनलाइन फोटो पाहिले होते. तिच्या निरागस लूकवर तो फिदा झाला. दोघांच्या वयात दोन वर्षांच अंतर आहे. प्रियकर प्रेयसीकडून होणारा हा सर्व अत्याचार फक्त एकाच गोष्टीसाठी सहन करत होता.

बॉयफ्रेंडच बोट कापलं, दारुत बुडवून फ्रिजमध्ये ठेवलं, खतरनाक गर्लफ्रेंडची गोष्ट
love revenge
Image Credit source: AI Genreated Image
| Updated on: May 12, 2025 | 1:55 PM

एका 23 वर्षाच्या मुलीने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. तिने बॉयफ्रेंडच बोट कापून फ्रिजमध्ये ठेवलं. आरोपी मुलीच म्हणणं आहे की, ती तिच्या प्रियकरावर इतकं प्रेम करते की, प्रियकराने दुसऱ्या कोणाची अंगठी बोटात घालू नये, म्हणून तिने बोटच कापून टाकलं. जापानच्या होन्शू बेटावरील कंसाई क्षेत्रातील ओसाकामधील ही घटना आहे. 21 वर्षाच्या पीडित व्यक्तीने स्वत: पोलिसांना फोन करुन या भयानक घटनेबद्दल सांगितलं. प्रेयसी त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. बेक्रअपवरुन दोघांमध्ये भांडण झालं. संतापलेली गर्लफ्रेंड साकी सातोने त्याच्यावर हल्ला चढवला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिलय. युवकाने मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कपल फ्लॅटवरच होतं. युवकाच्या गालावर आणि नाकावर मारहाणीच्या खूणा होत्या. फ्लॅटमध्ये पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तो खरं बोलतोय हे स्पष्ट झालं.

रिपोर्टनुसार, 2023 मध्ये पीडित 19 वर्षांचा होता. त्याने सातोचे काही ऑनलाइन फोटो पाहिले होते. तिच्या निरागस लूकवर तो फिदा झाला. काही काळाने दोघे रिलेशनशिपमध्ये आले. जुलैपासून एकत्र राहू लागले. सातो खूप वर्चस्व गाजवणाऱ्या स्वभावाची होती. तिला फक्त हो ऐकायची सवय होती. तिने लवकरच युवकाला कंट्रोल करायला सुरुवात केली. बँक पासबुक आणि त्याचा स्मार्टफोन ताब्यात घेऊन वापर सुरु केला. युवकाचा आरोप आहे की, मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुद्धा तिने अशाच प्रकारची त्याच्यासोबत क्रूरता केली होती.

प्रेयसी इतकी सुंदर आहे की…

ऑक्टोंबर महिन्यात ब्रेकअपनंतर सातोने कुऱ्हाडीने युवकाच रिंग फिंगर कापलं. त्यानंतर ते बोट अल्कोहलमध्ये टाकून फ्रिजमध्ये ठेवलं. आरोपी प्रेमिकेचा दावा आहे की, युवकाने स्वत:च असं केलं. पण पोलिसांना तिच्या थ्योरीवर विश्वास नाहीय. तपास सुरु आहे. पीडित युवकाच म्हणणं असं आहे की, प्रेयसी इतकी सुंदर आहे की, तो तिला सोडू शकत नाही. म्हणून तो तिचं क्रूर नेचर सहन करत होता. त्या बद्दल कुठे काही सांगितलं नाही.