AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : चारित्र्यावर संशय घेत सतत भांडायचा, रिक्षा चालकाने लिव्ह -इन पार्टनरची केली हत्या

पार्टनरसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या रिक्षा चालकाने तिची निर्घृण हत्या केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. मात्र त्या वादाचा शेवट असा दु:खद आणि हिंसक होईल याची कोणालाच कल्पना नव्हती.

Kalyan Crime : चारित्र्यावर संशय घेत सतत भांडायचा, रिक्षा चालकाने लिव्ह -इन पार्टनरची केली हत्या
| Updated on: Oct 06, 2023 | 8:29 PM
Share

कल्याण | 6 ऑक्टोबर 2023 : आजकाल अनेक जण लिव्ह-इन रिलेशनमध्ये रहायला लागलं आहेत. एकमेकांवर प्रेम असेल, एकत्र रहायची इच्छा असेल पण लग्नाची कमिटमेंट नको तर बरेच जण लिव्ह-इनचा (live in relationship) पर्याय निवडताना दिसतात. पण सगळ्यांच्याच प्रेमाचा शेवट गोड होतो असं नाही. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे ‘अन् ते सुखीने राहू लागले… ‘ असा गोड शेवट सर्वांच्याच नशिबी येतोच असंही नाही.

काहींची स्टोरी मध्येच संपते, थांबते किंवा काहींच्या नशीबी अतिशय दु:खद शेवट येतो. कल्याणमध्ये एका स्टोरीचा असाच एक दु:खद आणि तितकाच हिंसक शेवट झाल्याचे समोर आले आहे. लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या रिक्षा चालकाने त्याच्या पार्टनरची हत्या (crime news)  केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये (crime in kalyan)  घडल्याचे उघडकीस आलं आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली.

चारित्र्यावर संशय घेत झाला वाद

कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरातील विजयनगर आमराई परिसरात आरोपी राहतो. विजय असे त्याचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. तो एका 38 वर्षीय महिलेसोबत लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये रहात होता. मात्र गेल्या काही काळापासून त्या दोघांमध्ये खटके उडायचे, अनेकदा मोठ्याने भांडणंही व्हायची. आरोपी विजयचा त्याच्या पार्टनरच्या चारित्र्यावर संशय होता. याच मुद्यावरून त्यांच्यात वाद व्हायचे.

घटनेच्या दिवशीही त्या दोघांचं जोरदार भांडण झालं होतं. संतापाच्या भरात आरोपी विजयने धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपी हा हत्येनंतर फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला आणि अवघ्या काही तासांतच त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

भिवंडीतही झाली होती हत्या 

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील पार्टनरचा जीव घेतल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात उघडकीस आल्या आहेत.  गेल्या महिन्यातच भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे एका महिलेचा तिच्या प्रियकराने खून केला.  यापूर्वी तिचा विवाह झाला होता, मात्र ती पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर तिच्या प्रियकरासोबतच ती घरात राहत होती. मात्र त्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी जोर लावून दरवाजा उघडला असता त्या महिलेचा मृतदेह किचनमध्ये सापडला. तिचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा प्रियकर फरार झाला.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?