
जर तुम्हाला सुंदर मुली हव्या असतील तर फक्त या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन करा… असे मेसेज कानपूरमध्ये बरेच पाहायला मिळत होते. जेव्हा या मेसेजमागचं सत्य समोर आलं, तेव्हा सर्वांना घाम फुटला. खरंतर, कानपूरच्या कल्याणपुर परिसरात पोलिसांनी ऑनलाइन देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी व्हाट्सअॅपद्वारे ग्राहकांशी संपर्क साधायची. मुलींचे फोटो आणि रेट आधीच पाठवले जायचे. ग्राहकाने पसंत केल्यानंतर मुलींना हॉटेल, घर किंवा इतर ठिकाणी पाठवलं जायचं.
या रॅकेटची खास बाब म्हणजे, जर ग्राहकाकडे भेटण्यासाठी जागा नसेल, तर टोळी स्वतःच ‘क्यूबिकल’ नावाच्या छोट्या-छोट्या खोल्या भाड्याने द्यायची. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा घराच्या तळघरात अशा क्यूबिकल्सचा शोध लागला, ज्या दोन तासांसाठी 500 रुपयांना भाड्याने दिल्या जायच्या.
रशियन आणि कॉलेजच्या मुलीही होत्या सामील
या टोळीची व्याप्ती फक्त स्थानिक मुलींपुरती मर्यादित नव्हती, तर मागणीनुसार रशियन महिलाही उपलब्ध करून दिल्या जायच्या. याशिवाय, अनेक कॉलेजमधील मुलीही या धंद्यात सामील होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन संचालक, दोन महिला आणि सात ग्राहकांना अटक केली आहे. यामध्ये एक तरुणी आणि दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. छापेमारीदरम्यान पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह सामग्री जप्त केली आहे.
तळघरात चालत होता गैरप्रकार
ज्या घरात हे रॅकेट चालत होतं, तिथे तळघर खास देह व्यापारासाठी तयार करण्यात आलं होतं. क्यूबिकल्स अशा प्रकारे बनवण्यात आली होती की, तिथे दोन तासांसाठी कोणताही ग्राहक थांबू शकेल आणि नंतर दुसरा ग्राहक आत जाईल. एडीसीपी कपिल देव सिंह यांनी सांगितलं की, या टोळीविरुद्ध अनैतिक देह व्यापार (Prevention of Immoral Trafficking Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या रॅकेटशी आणखी कोण-कोण जोडलेले आहे आणि हा धंदा किती काळापासून चालत होता याचाही तपास करत आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)