शाळेच्या मुख्याध्यापकाला दांडक्यानं दिला चोप, कारणंही तसंच…!

काही युझर्सनी मुलींच्या शौर्याचं कौतुक केलं तर काहींनी...

शाळेच्या मुख्याध्यापकाला दांडक्यानं दिला चोप, कारणंही तसंच...!
school principle
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 22, 2022 | 1:39 PM

श्रीरंगपट्टण, कर्नाटक: मुलींच्या एका ग्रुपने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण कर्नाटकातील असून, एका कथित शाळेच्या मुख्याध्यापकाला काही विद्यार्थ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. असा दावा करण्यात आला होता की, मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, त्यानंतर पीडितेने इतर विद्यार्थिनींसह त्याला मारहाण केली. विद्यार्थिनींनी शाळेतील मुख्याध्यापकांवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीये.

या घटनेचा व्हिडिओ 15 डिसेंबर रोजी @HateDetectors ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. “कर्नाटकच्या मांड्या येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मारहाण केली आणि एकाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या स्वाधीन केले. श्रीरंगपट्टणच्या काटेरी गावात ही घटना घडली. चिन्मयानंदमूर्ती असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे.”

या क्लिपला अडीच हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 54 लाईक्स मिळाले आहेत. या ट्विट थ्रेडवर अनेक युझर्सनी आपली प्रतिक्रिया दिली. काही युझर्सनी मुलींच्या शौर्याचं कौतुक केलं तर काहींनी अशा हेडमास्तरांमुळे शाळा बदनाम होत असल्याचं लिहिलं.

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, विद्यार्थी त्या व्यक्तीला जमिनीवर फेकून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आहेत. या दरम्यान एक विद्यार्थिनी म्हणतेय- तुम्ही तिला का हात लावला सर? तुम्ही प्रिन्सिपल आहात ना?

हे प्रकरण मांड्या जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील आहे. शाळेच्या आवारातच 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. आरोपीवर आयपीसी कलम 354 A (लैंगिक छळ), 354 D (पाठलाग करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि पोक्सोच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय.

द इंडियन एक्सप्रेसमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, शाळेच्या एका विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, बुधवार, 14 डिसेंबरच्या रात्री मुख्याध्यापकांनी (चिन्मयानंद) तिला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या दिशेने धाव घेतली आणि काही वेळाने सहकारी विद्यार्थिनींना घेऊन परत आली आणि त्यांनी मिळून त्या व्यक्तीला काठीने मारहाण केली.

गेली 6 वर्ष हायस्कूल शिक्षक म्हणून काम करणाऱ्या चिन्मयानंदला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला निलंबित करण्याचीही चर्चा आहे.