
Crime : समाजात अनेक घटना घडलेल्या आपण पाहतो, काही घटना अशा असतात की ज्या ऐकूनच आपल्या अंगावर काटा येतो. अशीच एक घटना आहे, ज्यामध्ये आईसक्रीम पार्लर चालवणाऱ्या एका महिलेने प्रेग्रंट होण्यासाठी दोन तरूणांना संपवलं होतं. नेमकं काय कारण होतं की ज्यामुळे तिने इतकं मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. क्रांझा असं संबंधित महिलेचं नाव होतं.
नेमकं काय झालं होतं?
क्रांझाचा जन्म मेक्सिकोमध्ये झाला, तिचे वडिल शिस्तीचे होते. क्रांझाच्या वडिलांना स्पेनमध्ये नोकरी मिळाल्यामुळे त्यामुळे तिकडेच तिचं शिक्षण होतं. शाळेमध्ये टॉपर असायची, बघता बघता ती मोठी झाली कॉलेजला गेली. तिथे एका मुलासोबत ती रिलेशनशीपमध्ये येते. दोघेही कोर्टात जाऊन लग्न करतात मात्र काही दिवसातच तिचा बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींसोबतही रिलेशनमध्ये असल्याचं तिला समजतं. आपली फसवणूक झाल्याचं तिला समजल्यावर ती त्याला संपवायचं ठरवते मात्र ती काही यात यशस्वी होत नाही. शेवटी ती घर सोडून जर्मनीला जाते.
जर्मनीमध्ये एका आईसक्रीम पार्लरमध्ये काम करते. तिथे होलगर नावाच्या तरूणासोबत तिची ओळख होते आणि दोघे काही दिवसांनी लग्न करतात. क्रांझाला लहान मुलांची आवड होती, तिला वाटायचं की आपलीही लहान मुलं असावीत. होलगरसोबत लग्न झाल्यावर सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित असतं मात्र नंतर खटके उडू लागतात. शेवटी दोघे बदल म्हणून जर्मनी सोडून ऑस्ट्रियाला जातात. तिथे व्हियानामध्ये दोघे आईसक्रीम पार्लर सुरू करतात सर्व काही सुरळीत होतं. मात्र क्रांझाची आई होण्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. यावरून दोघांमध्ये भांडणं सुरू होतात आणि दोघे घटस्फोट घेतात.
या काळातच क्रांझाच्या आयुष्यात आणखी एक मुलगा येतो. ती त्याच्यासोबत फिरते मजा करते. एक दिवस आईसक्रीम पार्लरवरून दोघांमध्ये भांडण होतं. शेवटी क्रांझा आपल्या नवऱ्याला गोळ्या मारून संपवते. एका बाथटपमध्ये बॉडीचे तुकडे करून टाकते, त्यावर काँक्रिट लावते. तिच्या तिसऱ्या बॉयफ्रेंडचा आईसक्रीम फ्रिझरचा व्यवसाय असतो. तो बाथटपमध्ये त्या फ्रिझरमध्ये ठेवते. तिसऱ्या बॉयफ्रेंडसोबत ती स्वत:वर खूप खर्च करते जेणेकरून तो तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे जावू नये. मात्र त्याचेसुद्धा अनेक मुलींसोबत संबंध असल्याचं समजल्यावर ती त्यालाही संपवते.
2008 मध्ये ती पहिल्यांदा पतीला संपवते आणि तीन महिन्यातच दुसऱ्या बॉयफ्रेंडलाही संपवते. यानंतर रोनाल्ड नावाच्या तरूणासोबत लग्न करते आणि ती गर्भवती राहते मात्र तिने केलेले गुन्हे काही लपून राहत नाहीत. कारण ज्या बेसमेंटमध्ये फ्रिझर ठेवले होते तिथल्याच जवळच्या शॉपमधील पाण्याचा पाईप खराब होतो. ती पाण्याची लाईन दुरूस्त करण्यासाठी प्लंबरला बोलावलं जातं. प्लंबर आईसक्रीम खाण्यासाठी फ्रिझर उघडतो तर त्याला तिथे ए मानवी पाय दिसतो. त्यावेळी सर्व भांडाफोड होतो आणि क्रांझाला अटक केली जाते. 2010 ला तिला कोर्ट जन्मठेपेची शिक्षा देतं. 2012 मध्ये तिला पुरूषांच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. इतिहासात पहिल्यांदा महिलेला पुरूषांच्या जेलमध्ये डांबलं होतं. आतासुद्धा ती शिक्षा भोगत असल्याची माहिती आहे.