
एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका साडेतेरा वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म दिला. या घटनेने मुलींच्या वसतिगृहातील मुलींची सुरक्षा आणि तिथल्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई केली. वसतिगृहाच्या अधीक्षकाला निलंबित केलं. पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाटमधील हे हैराण करणारं प्रकरण आहे. बैहर विकासखंड अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील हे प्रकरण आहे. परसामऊ कस्तूरबा गांधी वसतिगृह जिल्हा शिक्षण केंद्राच्या अधीन आहे. जनजातीय कार्य विभागाच्या सहायक आयुक्ताने कस्तूरबा गांधी बालिका वसतिगृहाच्या अधीक्षिका (प्राथमिक शिक्षक) श्रीमती चैनबती सैयाम यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केलय.
विद्यार्थिनीच्या शरीरस्वास्थामध्ये होणारे बदल आणि तिचं वर्तन याबद्दल अधीक्षिकेने कुठल्याही प्रकाराची संवेदनशीलता दाखवली नाही, असं चौकशीत समोर आलय. विद्यार्थिनी वारंवार वसतिगृहात नसायची. पण व्यवस्थापनाने कधीही तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला नाही किंवा तिची आरोग्य तपासणी केली नाही.
त्याचे पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध होते
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. पीडितेच्या जबानीवरुन पोलिसांनी गावातीलच एका युवकाला अटक केली. त्याचे पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध होते असं म्हटलं जातय. महिला पोलीस स्टेशनच्या प्रभारी किरण वरकडे आणि डीपीसी जीपी बर्मन यांनी पुष्टि केली की, मुलगी आठव्या इयत्तेत शिकत असून तिचं वय अवघं साडेतेरावर्ष आहे.
कोणाला याबद्दल काहीच कसं कळलं नाही
या संपूर्ण प्रकरणात हॉस्टल वार्डन आणि आरोग्य विभागाची एएनएम (ANM) यांच्याकडून मोठं दुर्लक्ष झाल्याचं डीपीसी जीपी बर्मन यांनी मान्य केलं. सध्या पीडिता छात्रा आणि तिचं नवजात बाळ दोघेही स्वस्थ आहेत. चांगल्या देखभालीसाठी तिला जिल्हा ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलय. प्रशासन आता याची चौकशी करतय की, वसतिगृहात राहणारी अल्पवयीन मुलगी इतके महिले गर्भवती होती आणि कोणाला याबद्दल काहीच कसं कळलं नाही.