AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुभाजक तोडून ट्रकची कारला धडक, एकाचा मृत्यू, महिला पोलिसाच्या पतीसह दोघे जखमी

कारमध्ये अडकलेल्या दोघा गंभीर जखमी तरुणांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी गिरीश माने हे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षा कांबळे-माने यांची पती आहेत. ते रिपाइं आठवले गटाचे कार्यकर्तेही आहेत.

दुभाजक तोडून ट्रकची कारला धडक, एकाचा मृत्यू, महिला पोलिसाच्या पतीसह दोघे जखमी
सोलापुरात ट्रक-कारचा भीषण अपघात
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 22, 2021 | 12:38 PM
Share

सोलापूर : सांगोला येथून सोलापूरकडे येणार्‍या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत कारमधील तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील बेगमपूर गावाजवळील स्टेट बँकेसमोर रात्री एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात एपीआयचे पती जखमी

सुनील बनसिद्ध वाघमारे (वय 31, रा. टिळकनगर, मजरेवाडी, सोलापूर) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. गिरीश ब्रम्हदेव माने (रा. अरविंद धाम, पोलीस वसाहत, सोलापूर) आणि हर्षवर्धन मलिक सर्वगोड (वय 35, रा. गजाजन नगर, मजरेवाडी, सोलापूर ) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. यातील जखमी गिरीश हे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षा कांबळे-माने यांची पती आहेत. गिरीश माने हे रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते आहेत.

कारचा दरवाजा गॅस कटरने कापला

या अपघाताची माहिती कळताच कामती पोलीस आणि गावातील ग्रामसुरक्षा दलातील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या दोघा गंभीर जखमी असलेल्या गिरीश आणि हर्षवर्धन या तरुणांना बाहेर काढून तत्काळ सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवून देण्यात आले. तर जागीच मृत्यू झालेल्या सुनील यास कारचा दरवाजा गॅस कटरने कापून बाहेर काढले.

नेमकं काय घडलं?

गिरीश माने आणि त्यांचा मित्र हे सोलापूरहून एका खासगी कामानिमित्त (एमएच 13 डीटी 1891) या कारमधून सांगोला येथे गेले होते. काम संपवून ते रात्री उशिरा परत सोलापूरला निघाले होते. दरम्यान सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने सिमेंट घेऊन भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने निघालेल्या ट्रकने (एमएच 13 डी क्यू1270) महामार्गावरील बेगमपूर येथील स्टेट बँकेसमोर कारला समोरून जोरदार धडक दिली. यामुळे कारमधील चालकाशेजारी बसलेल्या सुनील वाघमारे याचा जागीच मृत्यू झाला.

गिरीश आणि हर्षवर्धन या दोघांच्या हात, पाय व डोक्याला जबर मार लागला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजक तोडून ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. सोलापूरकडे निघालेली कार उलट दिशेला काही अंतर फरफटत गेली. घटनास्थळापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर ट्रक थांबला. घटनेनंतर ट्रक चालकाने तत्काळ पलायन केले.

मध्यरात्री ग्रामसुरक्षा दल अपघातग्रस्तांच्या मदतीला

दरम्यान घटनेनंतर कांही वेळातच कामती पोलीस घटनास्थळी पोचले. मध्यरात्रीनंतरची वेळ असूनही महामार्गावर घडलेल्या या अपघाताच्या मदतीसाठी गावातील ग्रामसुरक्षा दलातील लखन ताकमोगे, अमर गोडसे, संजय चव्हाण, पपूल शेख, गजानन गुंडाळे या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.

संबंधित बातम्या :

PHOTO | औरंगाबादमध्ये महामार्गावर बस उलटली, जखमी प्रवाशांना सोडून ड्रायव्हरचा पळ

कारच्या धडकेनंतर बाईक 60 फूट उंच हवेत उडाली, महिलेचा जागीच मृत्यू, औरंगाबादेत अपघाताचा थरार

CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...