AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80 वर्षांच्या वृद्धेवर शारीरिक अत्याचार, अहमदनगरमध्ये 21 वर्षीय तरुणाला दहा वर्षांची शिक्षा

80 वर्षांच्या वृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या अहमदनगरमधील आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाना चंदू निकम (वय 21 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी बरालिया यांनी ही शिक्षा सुनावली.

80 वर्षांच्या वृद्धेवर शारीरिक अत्याचार, अहमदनगरमध्ये 21 वर्षीय तरुणाला दहा वर्षांची शिक्षा
उपहार आग प्रकरणात पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी अंसल बंधूंना सात वर्षांची शिक्षा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 23, 2021 | 11:31 AM
Share

अहमदनगर : अहमदनगरमध्ये 80 वर्षांच्या वृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 21 वर्षीय तरुणाने वृद्धेला खाली पाडून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

80 वर्षांच्या वृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या अहमदनगरमधील आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाना चंदू निकम (वय 21 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी बरालिया यांनी ही शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण?

भादंवि कलम 376 प्रमाणे 10 वर्ष सक्तमजुरी तसेच 25 हजार रुपये दंड, आणि दंड न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा आरोपीला सुनावण्यात आली आहे. आरोपीने फिर्यादी वृद्ध महिलेच्या तोंडावर दगड मारला होता. त्यानंतर तिची मान पिरगळून तिला खाली पाडत तिच्यावर जबरदस्ती शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. अखेर या प्रकरणी 21 वर्षीय आरोपीला कोर्टाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगरमध्ये वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

दुसरीकडे, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये उघडकीस आली होती. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, अशा कमेंट्स करत तरुणाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून बदनामीचाही प्रयत्न करण्यात आला होता.

उस्मानाबादेत छेड काढणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी

उस्मानाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी आरोपीला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायाधीश एन. एच. मखरे यांनी यासंदर्भात निकाल दिला. शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीची सलमान चांद पठाण (वय 19 वर्ष ) हा तरुण 2018 मध्ये वारंवार छेड काढत होता. घरातून कॉलेजला जाता-येताना तिला रस्त्यात अडवून, तसेच मागे लागून तो तिची छेड काढत असल्याचा आरोप आहे. उस्मानाबाद कोर्टाने तरुणाला शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दरम्यान, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 33 वर्षीय मिलिंद पांडुरंग राऊत (रा. साबळे लेआऊट, वर्धा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता.

संबंधित बातम्या :

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा

काविळीचे निदान करताना विवाहितेचा विनयभंग, आरोपीला पतीकडून बेदम चोप

अकरावीतील विद्यार्थिनीची छेड, उस्मानाबादेत 19 वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरी

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या