छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा
प्रातिनिधिक फोटो

अहमदनगर : वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, अशा कमेंट्स करत तरुणाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून बदनामीचाही प्रयत्न करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विजयकुमार बलदवा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, असं भाष्य करत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

महिलेच्या पतीलाही मेसेज

महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून सामाजिक आणि कौटुंबिक बदनामी केल्याचा आरोप आहे. तसेच महिला अधिकाऱ्याचे पती आणि मुलीबद्दल फोनवर अश्लील आणि अर्वाच्च भाषेत संभाषण केल्याचाही दावा केला जात आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही मेसेज पाठवून त्रास दिला जात होता.

वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दरम्यान, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 33 वर्षीय मिलिंद पांडुरंग राऊत (रा. साबळे लेआऊट, वर्धा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता.

मुंबईत डॉक्टरकडून नर्सचा विनयभंग

दुसरीकडे, मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला होता

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

काविळीचे निदान करताना विवाहितेचा विनयभंग, आरोपीला पतीकडून बेदम चोप

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा

(Ahmednagar Shevgaon Senior Lady officer allegedly molested)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI