काविळीचे निदान करताना विवाहितेचा विनयभंग, आरोपीला पतीकडून बेदम चोप

22 वर्षीय पीडिता काविळीवर उपचार करण्यासाठी 8 जुलै रोजी आरोपीकडे आली होती. तेव्हा आरोपीने पीडितेच्या अंगाला स्पर्श केला. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बोलावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे

काविळीचे निदान करताना विवाहितेचा विनयभंग, आरोपीला पतीकडून बेदम चोप
भाईंदरमध्ये विवाहितेचा विनयभंग

भाईंदर : पत्नीची छेड काढणाऱ्या तरुणाला पतीने चोप दिल्याची घटना समोर आली आहे. मुंबईजवळ भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अस्लम शेखला पोलिसांनी बेड्या ठोकला आहेत.

भाईंदर पूर्वेतील फाटकाजवळ अन्वर अपार्टमेंटमध्ये आरोपी अस्लम शेख राहतो. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आरोपी कावीळचे निदान करतो. त्याचाकडे नेहमीच काविळीवर उपचार करण्यासाठी रुग्णांची गर्दी असते.

नेमकं काय घडलं?

22 वर्षीय पीडिता काविळीवर उपचार करण्यासाठी 8 जुलै रोजी त्याच्याकडे आली होती. तेव्हा आरोपीने पीडितेच्या अंगाला स्पर्श केला. सुरुवातीला पीडितेने त्याकडे लक्ष दिले नाही. अस्लम शेखने तिला 10 जुलै रोजी परत बोलावले. त्यावेळी पीडितेचा हात पकडून “मेरे से दोस्ती करोगी?” असं विचारत त्याने तिच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न केला.

पीडितेची पोलिसात तक्रार

आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडितेनी पोलीस ठाण्यात दिली आहे. हा सर्व झालेला प्रकार पीडितेनी आपल्या पतीला सांगितला, तेव्हा पतीच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. त्याने आरोपीला अस्लम शेखला चांगलाच चोप दिला.

नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून नर्सचा विनयभंग

दुसरीकडे, नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला आहे.

नर्सची पोलिसात तक्रार

नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन यूपी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉ. सुशील मिश्रा असे वासनांध आरोपी डॉक्टरचे नाव आहे. आरती हॉस्पिटलमध्ये तो पार्टनरशिपमध्ये मॅनेजमेंटचे काम पाहतो. रुग्णालयातील 21 वर्षीय नर्सचा त्याने विनयभंग केल्याची आरोप आहे. पीडित नर्सच्या तक्रारीवरून डॉक्टर सुशील मिश्रा याच्या विरोधात नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात विनयभंग, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

नालासोपाऱ्यात हॉस्पिटलमध्येच 21 वर्षीय नर्सचा विनयभंग, आरोपी डॉक्टर परागंदा

(Lady Molested while treatment on Jaundice Husband beaten up accused in Bhainder)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI