AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकरावीतील विद्यार्थिनीची छेड, उस्मानाबादेत 19 वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरी

उस्मानाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी आरोपीला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायाधीश एन. एच. मखरे यांनी यासंदर्भात निकाल दिला.

अकरावीतील विद्यार्थिनीची छेड, उस्मानाबादेत 19 वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरी
2013 मधील हत्या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 26, 2021 | 1:41 PM
Share

उस्मानाबाद : महाविद्यालयीन तरुणीची  छेड काढल्याप्रकरणी आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 19 वर्षीय आरोपी हा अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची 2018 मध्ये वारंवार छेड काढत असल्याचा आरोप होता. उस्मानाबाद कोर्टाने या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

उस्मानाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी आरोपीला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायाधीश एन. एच. मखरे यांनी यासंदर्भात निकाल दिला.

नेमकं काय घडलं?

शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीची सलमान चांद पठाण (वय 19 वर्ष ) हा तरुण 2018 मध्ये वारंवार छेड काढत होता. घरातून कॉलेजला जाता-येताना तिला रस्त्यात अडवून, तसेच मागे लागून तो तिची छेड काढत असल्याचा आरोप आहे. उस्मानाबाद कोर्टाने तरुणाला शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

अहमदनगरमध्ये वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

दुसरीकडे, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये उघडकीस आली होती. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, अशा कमेंट्स करत तरुणाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून बदनामीचाही प्रयत्न करण्यात आला होता.

वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दरम्यान, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 33 वर्षीय मिलिंद पांडुरंग राऊत (रा. साबळे लेआऊट, वर्धा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता.

संबंधित बातम्या :

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा

काविळीचे निदान करताना विवाहितेचा विनयभंग, आरोपीला पतीकडून बेदम चोप

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा

Follow Us
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....