VIDEO | क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची दाम्पत्याला बेदम मारहाण, व्हायरल व्हिडीओवरुन संताप

क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याने संबंधित पती पत्नीस बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. बालचंद राठोड असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. महिलेला अमानुष मारहाण केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली आहे.

VIDEO | क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची दाम्पत्याला बेदम मारहाण, व्हायरल व्हिडीओवरुन संताप
जळगावातील पाचोऱ्यात दाम्पत्याला बेदम मारहाण
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 12:17 PM

जळगाव : शेजाऱ्याने क्षुल्लक कारणावरुन दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावातील अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र तीन दिवसांनंतरही पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नसल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील हनुमानवाडी भागात ही घटना घडली. क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याने संबंधित पती पत्नीस बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. बालचंद राठोड असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर देखील पोलीसांनी याची दखल घेतली नसल्याचा दावा केला जात आहे. महिलेला अमानुष मारहाण केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली आहे.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण

याआधी, शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये समोर आली होती. पुरुषांसह महिलांनाही चोप देण्यात आला होता. बांधाच्या वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती समोर आली होती. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप आधी पीडित कुटुंबाने केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

Video | औरंगाबादेत मद्यधुंद तरुणांची अरेरावी, शिवीगाळ करत पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल