MD Drugs : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; जेजे रुग्णालय जवळून 508 ग्राम एम डी ड्रग सोबत 2 ड्रग पेडलर्सला अटक

| Updated on: Apr 27, 2022 | 7:43 PM

जेजे रुग्णालय 2 ड्रग पेडलर्स पोलिसांच्या गळाला लागले. त्यांच्याकडे चौकशी करून झडती घेतली असता, 508 ग्राम एम डी ड्रग मिळून आले.

MD Drugs : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; जेजे रुग्णालय जवळून 508 ग्राम एम डी ड्रग सोबत 2 ड्रग पेडलर्सला अटक
एम डी ड्रग
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : याच्याआधी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विभागाने मोठी कारवाई करत 38 किलोचा गांजा जप्त केला होता. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रँच युनिटने कारवाई करत 16 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे मेथाक्लॉन ड्रग्ज जप्त केले होते. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तिघा तस्करांना अटक केली होती. तर यानंतर शाळकरी मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून तस्करी होत असल्याची बातमीवरून कारवाई करत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात कारवाई करत दोन तस्करांना मानखुर्द परिसरातून अटक केली होती. या तस्करांकडून 1 किलो 935 ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले होते. या घटना ताज्या असतानाच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. यावेळी ही कारवाई मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स कंट्रोल आजाद मैदान युनिटने केली. ही कारवाई जेजे रुग्णालय (JJ Hospital) केली असून यात 508 ग्राम एम डी ड्रग जप्त केला आहे. तसेच 2 ड्रग पेडलर्सला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

2 ड्रग पेडलर्संना अटक

याबाबत माहिती अशी की, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाच्या आजाद मैदान युनिटला जेजे रुग्णालय जवळ एम डी ड्रगची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रकारे आजाद मैदान युनिटने सापळा लावला होता. त्यावेळी आज जेजे रुग्णालय 2 ड्रग पेडलर्स पोलिसांच्या गळाला लागले. त्यांच्याकडे चौकशी करून झडती घेतली असता, 508 ग्राम एम डी ड्रग मिळून आले. त्यांनतर ते जप्त करण्यात आले असून त्या 2 ड्रग पेडलर्संना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रगची किंमत जवळपास 76 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

इतर बातम्या :

Suicide : नेवाळीत 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

Ahmednagar Murder : शुल्लक कारणात झालेल्या भांडणातून एका युवकाचा खून

Ulhasnagar Police : उल्हासनगरातील अल्पवयीन मुलीची दोन वर्षांनी पश्चिम बंगालमधून झाली सुटका; पळवून नेणाऱ्याला पोलिसांकडून अटक