महाराष्ट्र शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; नोकरी करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेवून त्यांना बडतर्फ करणार तर 7800 उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी

| Updated on: Aug 04, 2022 | 8:01 PM

बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800 विद्यार्थ्यांपैकी अनेक जण शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत. नोकरी करणाऱ्या या बोगस शिक्षकांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; नोकरी करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेवून त्यांना बडतर्फ करणार तर 7800 उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

पुणे : महाराष्ट्र शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट( Maharashtra teacher recruitment scam case) समोर आली आहे. या घोटाळ्यात दोषी सापडलेल्या शिक्षकांवर गंडांतर येणार आहे. नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बडतर्फ केले जाणार आहे तर 7800 उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी घातली जाणार आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. पुणे याबर पोलिस(cyber police) या घोटाळ्याचा तपास करत आहेत.

राज्यात झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. पुणे सायबर पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आता या घोटाळ्यातील दोषींना कायमची परीक्षा बंदी घालण्यात आली आहे. घोटाळ्यात आढळलेल्या 7800 उमेदवारांना बेकायदेशीर अर्थता अपात्र ठरवण्यात आले आहे. या उमेदवारांची यादीच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांना अपात्र ठरविण्यासह त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांना यापुढे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घातली जाणार आहे.

नोकरी करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेणार

बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800 विद्यार्थ्यांपैकी अनेक जण शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत. नोकरी करणाऱ्या या बोगस शिक्षकांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

टीईटी परीक्षेत देखील गैरव्यवहार झाल्याच उघड

2019 प्रमाणेच 2018 साली घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत देखील गैरव्यवहार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याचा तपासही पुणे सायबर पोलिस करत आहेत. त्याचबरोबर 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले

म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होतं. 2018 च्या परीक्षेत देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात उमेदवार अपात्र ठरविण्यात येण्याची शक्यता आहे.

घोटाळा प्रकरणातील आरोपी जेलमध्ये

शिक्षण परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव ढेरे यांच्यासह लाच घेण्याची जबाबदारी असलेल्या जी ए टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे.