AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USS Abraham Lincoln : युद्धभूमीतून मोठी बातमी, US चा स्वाभिमान USS अब्राहम लिंकनवर थेट हल्ला, हजारो नौसैनिकांच्या या जहाजावर काय घडलय?

USS Abraham Lincoln : यूएसएस अब्राहम लिंकन ही अणूऊर्जेवर चालणारी Nimitz-class aircraft carrier आहे. प्रामुख्याने मध्य पूर्वेत आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकी सैन्य मोहिमासाठी या जहाजाची तैनाती केली जाते.

USS Abraham Lincoln :  युद्धभूमीतून मोठी बातमी, US चा स्वाभिमान USS अब्राहम लिंकनवर थेट हल्ला, हजारो नौसैनिकांच्या या जहाजावर काय घडलय?
USS Abraham Lincoln
| Updated on: Mar 13, 2026 | 10:46 AM
Share

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस भयावह होत चाललं आहे. अमेरिका आणि इराण दोन्ही बाजूने परस्परांवर जोरदार हल्ले सुरु आहेत. या दरम्यान इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एक मोठा दावा केलाय. मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यात आम्ही अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका अब्राहम लिंकनचं नुकसान केलय असा दावा IRGC ने केलाय. इराणच्या या दाव्यावर अजूनपर्यंत अमेरिका काही बोललेली नाही. IRGC ने शुक्रवारी एक स्टेटमेंट जारी केलं. ऑपरेशन दरम्यान अमेरिकन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकेला लक्ष्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अब्राहम लिंकनचं किती नुकसान झालय किंवा किती जिवीतहानी झालीय या बद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. हल्ल्यात अब्राहम लिंकनचं नुकसान झालय एवढच म्हटलय. आता अमेरिकेच्या स्टेटमेंट नंतरच पुढचं चित्र स्पष्ट होईल.

इराणच्या या दाव्यावर अजून अमेरिकेची प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिका इराणच्या या दाव्यावर काय बोलणार? ते लवकरच कळेल. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु होऊन आता 15 दिवस होत आलेत. हे युद्ध संपण्याऐवजी आता अजून भीषण बनत चाललं आहे.

हा चालता-फिरता अमेरिकेचा किल्ला

यूएसएस अब्राहम लिंकन ही अणूऊर्जेवर चालणारी Nimitz-class aircraft carrier आहे. प्रामुख्याने मध्य पूर्वेत आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकी सैन्य मोहिमासाठी या जहाजाची तैनाती केली जाते. हा चालता-फिरता अमेरिकेचा किल्ला मानला जातो.

कशी आहे अब्राहम लिंकन?

USS अब्राहम लिंकन अमेरिकेची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आहे. त्याचं वजन 1,00,000 टन पेक्षा जास्त आहे. त्याची लांबी 1100 फूट आहे. म्हणूनच या युद्धनौकेला चालता फिरता किल्ला म्हटलं जातं. याची सुरक्षा क्षमता अभेद्य आहे. अमेरिकेने इराणवरील हल्ल्याची सुरुवात याच युद्धनौकेवरुन केली होती. हे जहाज एअर ऑपरेशन्ससाठी मेन कमांड सेंटर आणि लॉन्च प्लॅटफॉर्म म्हणून काम करतं. मिडिया रिपोर्ट्नुसार USS अब्राहम लिंकनच्या ताफ्यात 5700 ते 6000 अमेरिकी नौसैनिक आहेत. USS अब्राहम लिंकन वर अमेरिकेची सर्वात घातक फायटर जेट्स F-22, F-35 तैनात आहेत.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार