Malegaon : गोळीबाराने मालेगाव हादरले; तरुणाची मांडी रक्तबंबाळ, पाठीवर कटरने वार, नेमके प्रकरण काय?

| Updated on: Jan 17, 2022 | 12:02 PM

गोळीबाराच्या घटनेने मालेगाव पुन्हा एकदा हादरले असून, दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे.

Malegaon : गोळीबाराने मालेगाव हादरले; तरुणाची मांडी रक्तबंबाळ, पाठीवर कटरने वार, नेमके प्रकरण काय?
CRIME
Follow us on

नाशिकः गोळीबाराच्या घटनेने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पुन्हा एकदा हादरले असून, दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. लूटमार करण्याच्या उद्देशाने अज्ञात टोळक्याने 2 तरुणांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मोहम्मद अब्रार अताउर रहेमान हा तरुण जखमी झाला असून, त्याच्या मांडीत गोळी घुसली आहे. तर त्याचा साथीदार तरबेज अहमद याच्या पाठीत कटरचे वार करण्यात आले. पवारवाडी पोलीस स्थानक हद्दीतील मुंबई आग्रा – महामार्गावरील स्टार हॉटेलजवळ ही घटना घडली आहे. त्यामुळे पचंक्रोशीत भीतीचे वातावरण आहे.

अशी घडली घटना

मोहम्मद अब्रार आणि तबरेज अहमदर हे मूळचे बिहारचे. हे दोघेही फेअर कंपनीत काम करतात. रविवारी दोघेही काम संपवून पाच वाजता आपल्या रूमवर आले. त्यांतर दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. तेव्हा तिघांना त्यांना अडवले. शस्त्रांचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. मात्र, दोघांनी विरोध करताच मारहाण सुरू केली.

गावठी पिस्तूलचा वापर

हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलने गोळीबार केला. त्याची गोळी अब्रारच्या मांडीत घुसल्याने तो जखमी झाला. तर तरबेजवर एकाने कटरचे वार केले. या हल्ल्यामुळे घाबरलेल्या अब्रार आणि तरबेज यांनी आरडाओरडा करताच हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी घटनास्थळी जावून पाहणीकेली. तसेच जखमींची विचारपूस केली. तसेच आरोपींचा शोध सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दहा दिवसांत दुसरी घटना

मालेगावमध्ये दहा दिवसांत झालेली ही गोळीबाराची दुसरी घटना आहे. यापूर्वी 8 जानेवारी रोजी म्हाळदे शिवारात गोळीबार झाला होता. अब्दुल मलिक आणि माजी नगरसेवक खलिल शेख यांच्यातील जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाहून एक जिवंत काडतूस, रिकामी पुंगळी जप्त केली होती. याप्रकरणी पोलिसांनी घटनेत वापरलेले पिस्तूल जप्त केले असून, माजी महापौर अब्दुल मलिक गटाचा एक संशयित फरार असल्याचे समजते. त्याच्याजवळ दुसरे पिस्तूल आहे. त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?