Malegaon riots| मालेगाव दंगल पेटविणाऱ्या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल

मालेगाव दंगलीप्रकरणी शहर बंदचे आवाहन करणारा रजा अकॅडमीचा अध्यक्ष डॉ. रईस रिझवी आणि सुन्नी जमियत उलेमाचा पदाधिकारी युसूफ इलियास हे दोघे प्रमुख संशयित आहेत. मात्र, पोलिसांना अजूनही त्यांचा शोध घेण्यात यश आलेले नाही.

Malegaon riots| मालेगाव दंगल पेटविणाऱ्या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल
Court
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 12:32 PM

नाशिकः नाशिक जिल्हा हादरवून टाकणाऱ्या मालेगाव दंगलीतील (Malegaon riots) वादग्रस्त प्रक्षोभक व्हिडिओप्रकरणी अखेर न्यायालयात (Court) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जियाऊर रहेमान जाविद अहमद आणि अम्मार शफिक अहमद अन्सारी हे संशयित आरोपी आहेत. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यात जियाऊर रहेमान जाविद अहमद आणि अम्मार शफिक अहमद अन्सारी यांचाही समावेश होता. मालेगाव दंगल प्रकरणी दाखल झालेले हे दुसरे आरोपपत्र आहे.

काय होता व्हिडिओ?

मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे येत आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलसह 4 बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे.

आमदारांचे आरोप

मालेगाव दंगलीप्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी रजा अकॅडमीवर आरोप केले होते. दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा आहे. मुंबईतून रजा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता.

मुख्य संशयित बेपत्ता

मालेगावमध्ये दंगलप्रकरणी पोलिसांनी रजा अकादमीच्या कार्यालयावर मध्यरात्री छापेमारी केली होती. दंगलीच्या घटनेला 12 जानेवारी रोजी दोन महिने पूर्ण झाले. या प्रकरणी मालेगाव बंदचे आवाहन करणारा रजा अकॅडमीचा अध्यक्ष डॉ. रईस रिझवी आणि सुन्नी जमियत उलेमाचा पदाधिकारी युसूफ इलियास हे दोघे प्रमुख संशयित आहेत. मात्र, पोलिसांना अजूनही त्यांचा शोध घेण्यात यश आलेले नाही. दंगलीप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?