Railway Police : फास्ट लोकलमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू, डोके रेल्वे ट्रॅकच्या खांबावर आदळले

| Updated on: Aug 04, 2022 | 8:26 AM

मृत झालेला तरूण बदलापूरचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डोंबिवली आणि दिवा स्थानकांदरम्यान अक्षय कांबळे हा तरूण बुधवारी मुंबईच्या जलद लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे.

Railway Police : फास्ट लोकलमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू, डोके रेल्वे ट्रॅकच्या खांबावर आदळले
मुंबई लोकल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई – मुंबईतील (Mumbai) डोंबिवली (Dombivali) आणि दिवा स्थानकांदरम्यान वेगवान लोकल ट्रेनमधून पडून एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी (Railway Police) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण सकाळी सीएसटीएमकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करीत होता. हा तरुण बहुधा फूटबोर्डवर उभा होता. त्याचे डोके रेल्वे ट्रॅकच्या खांबावर आदळले. त्यामुळे त्याचा खालीपडून जागीचं मृत्यू झाला आहे. हा तरुण महातारेश्‍वर मंदिराजवळ रेल्वे रुळावर पडला होता. मात्र, घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या व्यक्तीकडून मुंबईतील घाटकोपर स्थानकापर्यंतचे रेल्वे तिकीट आणि मोबाईल फोन पोलिसांना सापडला आहे.

कानात एअरफोन घालून प्रवास करीत होता

अक्षय कांबळे असं त्या संबंधित तरुणाचं नाव असून तो कानात एअरफोन घालून गाणी ऐकत होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्तापर्यंत कानात एअरफोन घालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मृ्त्यू झाले आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं ? तसेच तरूण नेमकं कोणत्या लोकलमधून खाली पडला याबाबत अधिकृत माहिती पोलिसांनी जाहीर केलेली नाही. संबंधित तरुणाचा मृतदेह हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्याचं शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय झालं

मृत झालेला तरूण बदलापूरचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डोंबिवली आणि दिवा स्थानकांदरम्यान अक्षय कांबळे हा तरूण बुधवारी मुंबईच्या जलद लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कांबळे सकाळी सीएसटीएमकडे जाणार्‍या उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करत होता. त्याचे डोके रेल्वे रुळावरील खांबाला आदळले तेव्हा तो बहुधा फूटबोर्डवर उभा होता. तो महातरडेश्वर मंदिराजवळ फास्ट ट्रॅकवर पडला. ही माहिती ज्यावेळी पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता.