
प्रेमाचं प्रतीक असलेल्या , जगभरात प्रसिद्ध असलेला ताजमहा ज्या शहरात आहे, त्याचा आग्रा शहरातून एका ब्लाईंड मर्डस केसची उकल करत पोलिसांनी धक्कादायक घटना उघड केली आहे. तेथील मलपुरा भागातील ही घटना आहे. 18 फेब्रुवारी 2024 रोजी राकेशच्या नातेवाईकाने असलेल्या काकाने ( आत्त्याचा नवरा) त्याला त्याच्या दुकानात बोलावलं आणि कोणालाही कळू न देता त्याची गळा दाबून हत्या केली. एवढंच नव्हे तर नंतर आरोपीने राकेशचा मृतदेह ड्रममध्ये भरला , लोडरने तो सुनसान जागी घेऊन गेला आणि त्यानंतर पेट्रोल टाकून तो आगीच्या हवाली केला. याप्रकरणाचा सातत्याने कसून तपास करणाऱ्या पोलिसांनी आता मुख्य आरोपी देवी राम याला अटक केली. मलपुरा येथून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, मात्र या गुन्ह्यात त्याला साथ देणारा त्याचा भाचा अद्याप फरार आहे.
ब्लॅकमेलिंगमुळे घेतला काटा काढण्याचा निर्णय
मृत तरुण राकेश हा आरोपी देवी सिंगच्या अल्पवयीन मुलीच्या संपर्कात होता असे पोलिस तपासात आढळलं होतं. राकेशने त्याच्या अल्पवयीन मुलीचे आंघोळ करत असतानाचे फोटो काढले होते आणि नंतर या फोटोंच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असा दावा आरोपीने केला. ही गोष्ट जेव्हा त्या मुलीचा वडिलांना म्हणजे आरोपीला समजलं तेव्हा त्याने राकेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
विश्वासाने दुकानात बोलावलं आणि मग
18 फेब्रुवारी 2024 च्या रात्री, आरोपी देवी रामने त्याच्या मेहुण्याचा मुलगा राकेश मुलगा लाल सिंग याला विश्वासात घेऊन त्याच्या मिठाईच्या दुकानात बोलावले. देवी रामचे मिठाईचे दुकान आग्रा ग्वाल्हेर महामार्गावर काकुआ ते कुबुलपूर या रस्त्यावर आहे. देवी रामच्या बोलावण्यावरून राकेश त्याच्या दुकानात पोहोचला. दुकानात पोहोचल्यानंतर आरोपीने मागून मफलर आणि लोखंडी तार वापरून राकेशचा गळा दाबून खून केला. यानंतर देवी रामने त्याचा भाचा नित्या किशोरला बोलावले आणि दोघांनीही मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरला. देवी राम आणि नित्य किशोर यांनी तो ड्रम एका लोडरमध्ये खारी नदीजवळील एका निर्जन भागात नेला. तेथे पोहोचल्यानंतर दोघांनीही ड्रम लोडरवरून खाली उतरवला आणि त्यावर पेट्रोल ओतून तो जाळून टाकला.
पुरावे मिटवले, मृतदेहाची ओळख पटवणही मुश्किल
आरोपींनी फक्त राकेशची हत्याच केली नाही तर पुरावे जाळून, फेकून देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृताचा मोबाईल फोन, मफलर आणि वायर खारी नदीत फेकून देण्यात आले, तर त्याची दुचाकी महामार्गाच्या कडेला सोडून देण्यात आली. त्यानंतर आरोपीने स्वतः त्याचे मिठाईचे दुकान बंद केले आणि दिल्लीला गेला आणि तिथे काम करू लागला. 20 फेब्रुवारी 2024 रोजी, ठाणे सैयाच्या पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पण त्याआधीच, पोलिसांना राकेशच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. पोलिसांनी प्राथमिक ओळख पटवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना घटनास्थळी बोलावले परंतु मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना राकेशची ओळख पटवता आली नाही. अखेर तो डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले. मृताचा डीएनए त्याच्या आईशी जुळला. आईच्या डीएनएशी जुळण्याच्या आधारे मृताची तांत्रिक ओळख पटवण्यात आली.
चौकशीत झाला खुलासा
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, मालपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस पथक, सर्व्हेलन्स सेल आणि एसओजी तैनात करण्यात आले. सातत्याने मजर ठेवून आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, पोलिसांनी 15 सप्टेंबर 025 रोजी आरोपीला जगदीशपूर पुलाजवळ अटक केली. चौकशीदरम्यान त्याने संपूर्ण घटना उघड केली. मात्र त्याचा भाचा अद्याप फरार आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत.