Mumbai crime : शुल्लक वाद नात्यांवर पडला भारी… भाऊच भावाच्या जीवावर उठला, मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली. प्रॉपर्टीचा वाद भावा-भावांच्या नात्यावर भारी पडला आणि मोठ्या भावाने लहान भावाचीच हत्या केली. जोगेश्वरी येथे ही खळबळजनक घटना घडली

Mumbai crime : शुल्लक वाद नात्यांवर पडला भारी...  भाऊच भावाच्या जीवावर उठला, मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 9:46 AM

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली. प्रॉपर्टीचा वाद भावा-भावांच्या नात्यावर भारी पडला आणि मोठ्या भावाने लहान भावाचीच हत्या केली. जोगेश्वरी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. घराच्या पुनर्विकासाबाबत मतभेद असल्यामुळेच मोठ्या भावाने लहान भावाला संपवल्याचा प्रकार जोगेश्वरी पूर्व येथे घडला. याप्रकरणी दीपक सावंत (वय 52) या आरोपीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, सुबोध राघोजी सावंत (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो जोगेश्वरी पूर्व येथील गांधीनगर परिसरातील हडकर चाळीत रहात होता. मात्र सुबोध याची त्याचाच मोठा भाऊ दीपक सावंतने हत्या केली. त्याला मेघवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वी हत्येचा प्रयत्न, मारहाण असे गंभीर १६ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला दारू पिण्याचे देखील व्यसन होते, अशी माहिती समोर आली आहे.

घराच्या वादातून भाऊच भावाच्या जीवावर उठला

मृत इसम सुबोध हा जोगेश्वरी पूर्वेला त्याच्या कुटुंबियांसोबत रहात होता.तो जेथे रहात होता त्या चाळीचा पुनर्विकास होणार आहे. त्यांच राहत घरं सुबोधच्या आईच्या नावे होते. इमारतीचा पुनर्विकास झाल्यावर त्यांना नवं घरं मिळणार होतं. मात्र ते घर पुनर्विकासासाठी देण्यास आरोपी दीपक याचा विरोधा होता. याच मुद्यावरून त्याचं नेहमी भांडण व्हायचं.

तसंच त्याला दारू पिण्याचंही व्यसन होतं. मंगळवारी दीपक आणि त्याचा छोटा भाऊ सुबोध यांचा वाद झाला. त्याच वादातून दीपकने घरातील एका टणक वस्तूने सुबोधच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात त्याच्या उजव्या भुवईवर गंभीर जखम झाली व तो खाली कोसळला.

सुबोधला तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी मृताची बहीण सुरेखा सावंत यांच्या तक्रारीवरून मेघवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी दीपकला अटक केली. त्याच्याविरोधात यापूर्वीही मारामारीचे, हत्येचा प्रयत्न केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या हत्येसंबदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.