
पाटणा | 26 ऑगस्ट 2023 : दारू पिणे वाईट हे सर्वांनाच माहीत आहे, त्याच्या दुष्परिणामांचीही (acohol side effects) आपल्याला कल्पना असतेच. पण तरीही बरेच लोकं दारू पीत असतात. पण याच दारूमुळे कुटुंबाची वाताहत होऊ शकते. अशीच एक दुर्दैवी घटना बांदामध्ये घडली. पतीला दारू पिण्यापासून रोखणे हे एका महिलेला खूपच महागात पडले.
पत्नीने दारू पिण्यापासून थांबवल्यामुळे रागावलेल्या पतीने सरळ फासाला लटकवून घेत आपले जीवनच संपवले. दारूच्या मुद्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत, अशी माहिती समोर आली आहे.
त्या दुर्दैवी घटनेच्या दिवशीही असंच काहीसं झालं. त्या दिवशी पत्नीने पतीला दारू पिण्यापासून रोखलं. यत्यामुळे तो चिडला आणि टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याने मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली.
ही दुर्दैवी घटना कोतवाली शहरातील शुकुल कुआं भागात झाली. तेथे राहणाऱ्या एका तरूणाला दारूचे भलतेच व्यसन होते. दारू पिऊन तो घरात रोज हंगामा करायचा, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. मात्र त्याची ही सवय पत्नीला आवडत नव्हती आणि ती त्याला थांबवायची. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. तो तरूण त्याची सर्व कमाई दारूवरच उधळायचा, असेही नातेवाईक म्हणाले.
त्या दिवशीही पत्नीने दारू पिण्यापासून रोखल्यानंतर त्या तरूणाचा संताप अनावर झाला आणि त्याने आयुष्य संपवले. मात्र तो एवढे टोकाचे पाऊल उचलेल असे कोणलाच वाटले. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.