मराठी गाणे लावले अन् इंजिनिअर असलेला राकेश भडकला…बंगळुरुमधील सुटकेस मर्डर केसमध्ये धक्कादायक सत्य

Crime News: गौरीने मराठी गाणे म्हटले. त्या गाण्यात वडील आणि मुलाच्या नात्याबाबत काही म्हटले होते. तसेच गौरीने राकेशचा मजाकही उडवला. त्याच्या चेहऱ्यावर हवा फुंकली. त्यानंतर राकेशला राग आला. त्याने तिला जोरात धक्का मारला. ती स्वयंपाकघरात पडली.

मराठी गाणे लावले अन् इंजिनिअर असलेला राकेश भडकला...बंगळुरुमधील सुटकेस मर्डर केसमध्ये धक्कादायक सत्य
Crime News
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 06, 2025 | 10:22 AM

Crime News: बंगळुरूतील एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातील ३२ वर्षीय तरुणी गौरी खेडेकर हिचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला होता. 26 मार्च रोजी झालेल्या या हत्याकांडेत गौरीचा पती राकेश राजेंद्र खेडेकरच आरोपी निघाला. गौरीचा खून केल्यानंतर राकेश यानेच घरमालकाला फोन करून फ्लॅटमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह असल्याचे सांगितले. त्यानंतर राकेश याला अटक करण्यात आली होती. राकेश याने पोलिसांना दिलेल्या जबाबातून धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. मराठी गाणे लावल्यानंतर राकेश संतापला. त्यानंतर त्याने गौरीची हत्या केली. इंजिनिअर असलेला राकेश एका कंपनीत मॅनेजर आहे.

राकेशने काय म्हटले?

राकेश याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले की, 26 मार्च रोजी संध्याकाळी राकेश आणि गौरी यांनी घरात काही वेळ घालवला. काही वेळ घालवल्यानंतर ते फिरायला निघाले. मग 7.30 वाजता पोहचले. राकेश रोज काम संपल्यावर दारु घेत होता. त्या दिवशी राकेश दारु घेतली गौरी नाश्ता देत होती. त्यानंतर दोघे जण आपआपले आवडते गाणे क्रमाक्रमाने वाजवण्यास सहमत झाले.

राकेश दारु घेता घेता गाणे गात होता. त्यानंतर गौरीचा नंबर आला. गौरीने मराठी गाणे म्हटले. त्या गाण्यात वडील आणि मुलाच्या नात्याबाबत काही म्हटले होते. तसेच गौरीने राकेशचा मजाकही उडवला. त्याच्या चेहऱ्यावर हवा फुंकली. त्यानंतर राकेशला राग आला. त्याने तिला जोरात धक्का मारला. ती स्वयंपाकघरात पडली. मग राकेश स्वयंपाकघरात असलेला चाकू उचलत शिविगाळ करु लागला. रात्री 8.45 ते 9 वाजेची वेळ होती. त्यावेळी राकेशने गौरीच्या गळ्यावर चाकूने दोन वार केले. पोटावर वार केले. ती रक्तबंबाळ झाली. तो तिच्याजवळ बसला. त्यानंतर तिच्या कृतीमुळे संताप झाल्याचे बोलू लागला. त्यानंतर गौरीचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला. रात्री १२ वाजता घरामालकाला फोन करुन घरात गौरीचा मृतदेह असल्याचे राकेशने सांगितले.

महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या राकेश खेडकर याचे गौरी अनिल सांब्रेकर हिच्यासोबत दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. राकेश एका कंपनीत मॅनेजर होता. गौरी गृहिणी होती. ते नोकरीच्या शोधात होती. राकेश मुंबईतील आहे. पत्नीच्या हत्येनंतर राकेश यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.