नर्सने रघुवीरला नको त्या अवस्थेतले फोटो काढू दिले, पण जेव्हा तिला नवऱ्याकडे जायचं होतं, तेव्हा त्याने…

याच रुग्णालयात तिच्यासोबत रघुवीर सुद्धा काम करायचा. एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमसंबंधात बदलली. त्यानंतर दोघे ऐकमेकांना एकट्यामध्ये भेटू लागले.

नर्सने रघुवीरला नको त्या अवस्थेतले फोटो काढू दिले, पण जेव्हा तिला नवऱ्याकडे जायचं होतं, तेव्हा त्याने...
extramarital affair
| Updated on: Dec 19, 2025 | 5:03 PM

एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या युवकाने याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. पाहता-पाहता हे फोटो व्हायरल झाले. या बद्दल माहिती मिळताच नर्सने नोएडाच्या फेज तीन पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवला. पोलिसांनुसार आरोपीचे पीडिते सोबत प्रेमसंबंध होते. पीडितेला तिच्या पतीकडे जायचे होते. उत्तर प्रदेशच्या नोए़डामधील हे प्रकरण आहे.

पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, पीडिता मूळची झारखंडची राहणारी आहे. ती नोएडाच्या फेज 3 मधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जनरल ड्यूटी असिस्टेंट पदावर कार्यरत होती. याच रुग्णालयात तिच्यासोबत रघुवीर सुद्धा काम करायचा. एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमसंबंधात बदलली. त्यानंतर दोघे ऐकमेकांना एकट्यामध्ये भेटू लागले.

तिला रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला

पीडितेच्या म्हणण्यांनुसार, प्रेम संबंधांदरम्यान आरोपीने खासगी क्षणाचे काही फोटो आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केले होते. आधी पीडितेला काही आक्षेप नव्हता. पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वादविवाद झाला. तिला रुग्णलायतून सुट्टी घेऊन काही दिवस पतीकडे झारखंडला जायचं होतं. तिने रघुवीरला ही गोष्ट सांगितली, त्यावर तो भडकला. त्याने तिला रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण जेव्ही ती ऐकत नव्हती. तेव्हा त्याने तिला बदनाम करण्याची धमकी दिली. मग, खासगी क्षणांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले.

ती स्वत: सोशल मीडियावर हे फोटो पाहून हैराण झाली

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या ओळखीच्या काही लोकांनी तिला फोन करुन या बद्दल सांगितलं. त्यानंतर पीडितेला आरोपीच्या कृत्याबद्दल समजलं. ती स्वत: सोशल मीडियावर हे फोटो पाहून हैराण झाली. अखेरीस तिने फेज 3 पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात रितसर तक्रार नोंदवली. नोएडा फेज 3 पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानुसार सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन या बद्दल माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या भूमिकेची सुद्धा चौकशी केली जातेय.