पैसे पाहून मौलवीची नियत फिरली, आपल्या शिष्याची हत्या करुन ‘दृश्यम’ स्टाईलने विल्हेवाट

वसीन 31 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेला. वसीन फर्निचर बनवण्याचे काम करतो. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्याचा फोनही बंद येत होता.

पैसे पाहून मौलवीची नियत फिरली, आपल्या शिष्याची हत्या करुन दृश्यम स्टाईलने विल्हेवाट
घरगुती जमिनीचा वाद
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 05, 2023 | 3:05 PM

पानिपत : पैशांसाठी मौलवीने आपला शिष्य असलेल्या मौलवीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने दृश्यम स्टाईलने मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र पोलीस चौकशी दरम्यान आरोपीचे बिंग फुटले आणि हत्येचा गुन्हा उघडकीस आला. आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेह एका निर्माणाधीन घरामध्ये गाडला. पोलिसांनी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणाहून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वसीन असे 28 वर्षीय मयत मौलवीचे नाव आहे तर दिलशाद असे आरोपी मौलवीचे नाव आहे.

कामावर गेला तो घरी परतलाच नाही

वसीन 31 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेला. वसीन फर्निचर बनवण्याचे काम करतो. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्याचा फोनही बंद येत होता. दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी रोजी त्याच्या भावाच्या मोबाईलवर वसीनच्या नंबरवरुन एक मॅसेज आला.

वसीनच्या भावाला मृतदेहाचा फोटो आणि मॅसेज पाठवला

‘मी जिंदमधून बोलतोय, तुमच्या भावाने आमच्या मुलीवर अन्याय केला आहे. म्हणूनच आम्ही त्याला मारले. वसीनने मुलीकडून 7 लाख 35 हजार रुपयेही घेतले होते. मरताना वसीनने आपल्या भावाचा नंबर दिला आहे. आता हे पैसे त्याच्या भावाकडून वसूल केले जातील’, असे मॅसेजमध्ये लिहिले होते.

व्हॉट्सअपवर वसीनच्या मृतदेहाचा फोटोही पाठवण्यात आला होता. यानंतर वसीनच्या भावाने पोलीस ठाणे गाठत हत्येची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी वसीनचे नातेवाईक, मित्र, शेजारी सर्वांकडे चौकशी सुरु केली.

वसीनचा गुरु दिलशादची चौकशी केली असता गुन्हा उघडकीस

चौकशीदरम्यान पोलिसांना वसीन मौलवी असल्याचे कळले. तसेच तो एका दिलशाद नामक मौलवीला गुरु मानत असल्याचेही कळले. त्यानुसार पोलिसांनी दिलशादची चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान पोलिसांना दिलशादवर संशय आला आणि त्यांनी दिलशादची कसून चौकशी केली.

पैशाच्या हव्यासातून गुरुने शिष्याला संपवले

यादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. वसीन एक प्रेयसी असून तिने वसीनला 7 लाख 35 हजार रुपये दिले होते. दिलशादही त्या महिलेला ओळखत होता. हे पैसे हडपण्यासाठी दिलशाद वसीनला यूपीतील एका निर्माणाधीन घरी घेऊन गेला. तेथे त्याने वसीनची बेदम मारहाण करत हत्या केली.

हत्या केल्यानंतर मृतदेह त्याच घरात एक खड्डा खोदून पुरला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. वसीनचे विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.