Crime News : शेतात शेळी घुसल्यामुळे अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण, मग…

अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केल्या आहेत.

Crime News : शेतात शेळी घुसल्यामुळे अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण, मग...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 24, 2023 | 12:15 PM

ओसिया : शेतात शेळी चारा खात असल्याचं समजल्यानंतर संतापलेल्या तरुणीने शेताकडे (field) धाव घेतली. त्यावेळी चिडलेल्या तरुणीने तरुणीला जाब विचारला त्यानंतर तरुणाने अल्पवयीन तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीचे केस पकडून तिला खेचले, त्याचबरोबर केस पकडून मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media video viral) झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याचं नाव ओमाराम असं आहे. या प्रकरणी ओरिया पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्याचं पोलिसांनी (police) सांगितलं आहे.

ही घटना राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चिडलेल्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं

ज्यावेळी व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही मागच्या चार दिवसांपुर्वी घडली आहे. शेळी गव्हाच्या पीकात चरत होती, त्याचा राग आल्याने तरुणीने आरोपी ओमाराम याचा जाब विचारला, त्यानंतर त्याने बेदम मारहाण केली. त्यावेळी तरुणीने त्या बकरीला बाहेर काढले, त्यानंतर घरच्यांना बोलावून या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली.

त्यावेळी दोघांच्यात वादाला सुरुवात झाली

शेळी त्या तरुणाला देण्यास तरुणीने नकार दिला होता. त्याचबरोबर त्या मुलीची आई सुध्दा तिच्यासोबत होती. त्याच शेतात ती शेळी बांधून घालणार होती. त्यावेळी दोघांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यानंतर राग आलेल्या तरुणाने त्या तरुणीला चापट मारली, मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणीला केस पकडून मारहाण केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तिथं जमलेल्या काही लोकांनी ते भांडण कसंतरी सोडवलं.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या प्रकरणात कमेंटच्या माध्यमातून पोलिसांना जाब विचारला आहे.