वैधता संपलेले प्रोडक्ट नवीन तारीख टाकून विकायचे, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश

| Updated on: Sep 28, 2022 | 12:04 AM

गुन्हे शाखेने 7 गोदामांवर छापे टाकून 3 कोटी, 28 लाख, 7 हजार, 111 रुपयांचा एक्स्पायरी मुद्देमाल जप्त केला आहे.

वैधता संपलेले प्रोडक्ट नवीन तारीख टाकून विकायचे, असा झाला टोळीचा पर्दाफाश
वैधता संपलेली सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 आणि 12 च्या पथकाने मुंबईत देशी-विदेशी ब्रँडेड कंपन्यांच्या एक्सपायरी मेकअपच्या वस्तूंचा (Expired Makeup Product) पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (Exposed) केला आहे. गुन्हे शाखेने 7 गोदामांवर छापे टाकून 3 कोटी, 28 लाख, 7 हजार, 111 रुपयांचा एक्स्पायरी मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सध्या एका आरोपीला अटक (Arrest) करण्यात आले आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपीला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अर्शद मोहरमली शेख असे अटक करण्यात आलेल्या 51 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 11 चे पथक आता या रॅकेटमधील उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे.

संगणकाच्या सहाय्याने एक्सपायरी वस्तूची तारीख वाढवायचे

आरोपी संगणकाच्या साहाय्याने एक्सपायरी डेट वाढवून एक्सपायरी क्रीम आणि मेकअपच्या वस्तू पुरवायचे. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये देशी-विदेशी ब्रँडेड कंपन्यांच्या महागड्या मेक-अप वस्तूंचा समावेश आहे. जे अर्ज करणाऱ्यांसाठी हानिकारक होते.

हे सुद्धा वाचा

मुंबई परिसरातील ब्युटी शॉपमध्ये करायचे विक्री

नॅशनल इम्पेक्स आणि एम.एस. इंटरनॅशनल या कॉस्मेटिक आणि ब्युटी प्रोडक्टच्या कंपनी वैधता संपलेल्या प्रोडक्टवर संगणकाच्या सहाय्याने नवीन वैधता तारीख टाकून प्रोडक्ट विकायचे. गोरेगाव, दानाबंदर, क्रॉफर्ड मार्केट, कांदिवली, घाटकोपर परिसरात या प्रोडक्टची विक्री होत होती.

याबाबत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 11, युनिट 12 आणि युनिट 8 ने वेगवेगळी पथके तयार केली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची छापेमारी

या पथकांनी एकाचवेळी गोरेगाव, क्रॉफर्ज मार्केट आणि दानाबंदर परिसरात छापेमारी केली. या छापेमारीत एकूण सात गोडाऊनमधील मालाची तपासणी केली. या तपासणीत 3 कोटी 28 लाख 7 हजार 111 रुपयांचा वैधता संपलेला माल पोलिसांनी जप्त केला.

संपूर्ण कारवाईत पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट येथील माल, गोडाऊनमधील माल, तसेच विक्री करुन मिळालेले 13 लाख 19 हजार 410 रुपये रोख, 14 हार्डडिस्क, दोन मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गोडाऊनच्या मॅनेजरलाही अटक करण्यात आली आहे. तसेच ब्युटी शॉपचा मालक याकुब उस्मान कापडिया या नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.