Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली ‘डर्टी डिमांड’; पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

उर्फी जावेदला ज्या व्यक्तीने त्रास दिला आहे, त्या व्यक्तीचा अश्लील कृत्यामागील हेतू तसेच पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली उदासीनता याबद्दल उर्फीने सोशल मीडियात एक विस्तृत पोस्ट लिहिली आहे.

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली डर्टी डिमांड; पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल
अभिनेत्री उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली 'डर्टी डिमांड'
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 14, 2022 | 8:01 PM

मुंबई : आपल्या हटके ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेद (Urfi Javed)ने पोलीस ठाण्यात धाव घेऊन एफआयआर (FIR) दाखल केला आहे. एका व्यक्तीने तिच्याकडे ‘डर्टी डिमांड’ (Dirty Demand) केल्याचा दावा तिने केला आहे. संबंधित व्यक्तीच्या त्या अश्लील कृत्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी उर्फीने केली आहे. ती व्यक्ती एका फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून व्हिडीओ सेक्स करण्याची मागणी करीत असल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र तिच्या तक्रारीला 14 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे म्हणणे मांडत तिने याबद्दलची अस्वस्थता सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. सोशल मीडियात लिहिलेल्या भल्या मोठ्या पोस्टमधून तिने संबंधित व्यक्ती आणि निष्क्रिय पोलीस यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल करीत ‘व्हिडीओ सेक्स’ची मागणी

उर्फी जावेदला ज्या व्यक्तीने त्रास दिला आहे, त्या व्यक्तीचा अश्लील कृत्यामागील हेतू तसेच पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली उदासीनता याबद्दल उर्फीने सोशल मीडियात एक विस्तृत पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीने माझा फोटो अपलोड केला होता. त्याप्रकरणी मी पोलिसात तक्रार केली होती. संबंधित फोटोच्या माध्यमातून ती व्यक्ती मला सध्या ब्लॅकमेल करत आहे. तो फोटो दाखवून व्हिडिओ सेक्स करण्याची मागणी केली जात आहे. हा प्रकार समाजातील स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. याप्रकरणी मी गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरला 14 दिवस उलटून गेले आहेत, तरी पोलिसांनी माझ्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी नाराजी उर्फीने व्यक्त केली आहे.

त्या व्यक्तीच्या मैत्रिणीच्या बहिणींशीही बोलले, पण…

उर्फीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी त्या व्यक्तीच्या मैत्रिणीच्या बहिणींशीही याबद्दल बोलले आहे. पण बहिणींनीही हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही. त्यांच्यासोबत पूर्वी मी काम केले आहे. त्या व्यक्तीने त्याच्यावर 50 मुली प्रेम करीत असल्याचा दावा केला आहे. संबंधित व्यक्ती पंजाब इंडस्ट्रीशी संबंधित आहे. उर्फी जावेद ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिने ‘भैया की दुल्हनिया’मध्ये अनी, ‘मेरी दुर्गा’मध्ये आरती, ‘बेपन्नाह’मध्ये बेला आदी भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस OTT मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी बहुतेक वेळा तिच्या आउटफिटबद्दल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. उर्फीने तिच्याकडे ‘डर्टी डिमांड’ करणाऱ्या व्यक्तीचा फोटो तसेच त्याने केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉटदेखील सोशल मीडियात पोस्ट केला आहे. (A person made a dirty demand to actress Urfi Javed; FIR filed in police station)