Nagpur Accident : मौद्यात चालकानं टॅक्सीला चाबी लावली, सवारीसाठी बसस्थानकावर गेला, टॅक्सी थेट पानठेल्यात घुसली

टॅक्सीचं नुकसान झालं. तसंच पानठेल्याला टॅक्सीनं धडक दिल्यानं पानठेल्याचंही नुकसान झालं. पानठेल्यासमोरील दोन दुचाकींचंही नुकसान झालं.

Nagpur Accident : मौद्यात चालकानं टॅक्सीला चाबी लावली, सवारीसाठी बसस्थानकावर गेला, टॅक्सी थेट पानठेल्यात घुसली
मौद्यात चालकानं टॅक्सीला चाबी लावली
सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 14, 2022 | 6:41 PM

नागपूर : जिल्ह्यातील मौदा येथील बसस्टँड परिसरात काली पिली टॅक्सी पान ठेल्यात घुसली. ड्रायव्हरने (Driver) गाडीला चाबी लावून ठेवली. त्यानंतर तो सवारीसाठी मौदा बसस्टँड (Mauda Bus Stand) येथे सवारी बघण्यासाठी गेला. उभी असलेली काली पिली अचानक सुरू झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या पान ठेल्यात घुसली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पण पान ठेल्यासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मौदा बस स्टँड हा अतिशय वर्दळीचा परिसर आहे. या ठिकाणी प्रवासी वाहतूक (Passenger Transport) करणाऱ्या डझनभर काली पिली ट्रॅक्स नेहमीच उभ्या असतात.

नेमकं काय घडलं

मौदा येथून नागपूरला टॅक्सी चालतात. हे टॅक्सीचालक बसस्थानकावरून सवाऱ्या घेऊन येतात. त्यानंतर टॅक्सी सुरू करतात. पण, एका चालकानं घाईगडबडीत टॅक्सीला चाबी लावली. त्यानंतर तो मौदा बसस्थानकावर सवारी पाहण्यासाठी गेला. टॅक्सीला चाबी लागली असल्यानं टॅक्सी सुरू झाली. पण, तिथं चालक नव्हता. त्यामुळं टॅक्सी थेट समोरच्या पानठेल्यात शिरली. टॅक्सीत सवाऱ्या नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, टॅक्सीचं नुकसान झालं. तसंच पानठेल्याला टॅक्सीनं धडक दिल्यानं पानठेल्याचंही नुकसान झालं. पानठेल्यासमोरील दोन दुचाकींचंही नुकसान झालं.

पोलीस करतात काय?

वाहतूक पोलिसांचं काम वाहतूक सुरळीत करण्याचं असतं. पण, ते याकडं लक्ष देत नसल्याचं दिसून येतं. टॅक्सी येतात. जातात. अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. बसस्थानकावरून सवाऱ्या नेल्या जातात. टॅक्सी कुठंही थांबते. येता का म्हणून प्रवाशांना विचारते. पण, पोलिसांचे टॅक्सी मालकांशी मधूर संबंध असल्यानं ते सहसा या टॅक्सीवर कारवाई करत नाहीत, असा आरोप केला जातो.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें