Mumbai Crime : बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीला अटक, सीसीटीव्हीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

काही दिवसांपूर्वी दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बँकेतून 3 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घरी जाणाऱ्या एका इसमावर पाळत ठेवत या टोळीने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्याजवळ गर्दी करुन त्या इसमाचे लक्ष विचलित करुन त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेतून ही साडे तीन लाखाची रक्कम काढून पोबारा केला होता.

Mumbai Crime : बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीला अटक, सीसीटीव्हीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीला अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 11:57 PM

मुंबई : गर्दीमधून लक्ष विचलित करुन बॅग लिफ्टिंग करणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) युनिट 11 ने अटक (Arrest) केली आहे. काही दिवसांपूर्वी एका इसमावर पाळत ठेवत त्यांच्याभोवती गर्दी करुन त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम या टोळीने लंपास केली होती. या घटनेचा सीसीटीव्ही हाती आल्यानंतर गुन्हे शाखेने शोध मोहिम सुरु करुन सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रिजवान शफी मुजावर ऊर्फ चाचा (47), मोहम्मद फहीम शाहीद खान (32), राकेशकुमार रामराज यादव ऊर्फ चक्की (31), विशाल अशोक शर्मा ऊर्फ लालु (39),अख्तर अन्वर शेख (32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Bag Lifting Gang Arrested, Mumbai Crime Branch Action Based on CCTV)

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या

काही दिवसांपूर्वी दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बँकेतून 3 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घरी जाणाऱ्या एका इसमावर पाळत ठेवत या टोळीने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्याजवळ गर्दी करुन त्या इसमाचे लक्ष विचलित करुन त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेतून ही साडे तीन लाखाची रक्कम काढून पोबारा केला होता. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुंबई गुन्हे शाखेने मालाड आणि अंधेरी पश्चिम परिसरातून पाच आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bag Lifting Gang Arrested, Mumbai Crime Branch Action Based on CCTV)

इतर बातम्या

VIDEO : कल्याणमध्ये गावगुंडांचा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा, आरोपींचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

Solapur Murder : सोलापुरात क्षुल्लक कारणातून वादातून तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या