Aryan Khan : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण, आर्यन खानसह सहा जणांना पुराव्यांअभावी क्लीन चीट

| Updated on: May 27, 2022 | 3:29 PM

एनसीबीने एमबीपीटीच्या आंतरराष्ट्रीय टर्मीनलवर विक्रांत, इश्मीत, अरबाज, आर्यन आणि गोमित यांची झडती घेतली, तर काॅर्डेलिया क्रूजवर नुपूर, मोहक आणि मुनमुन यांची तपासणी करण्यात आली. आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे नार्कोटिक्स सापडले. मात्र मोहकविरोधात अन्य काही पुरावे सापडल्याने त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केल जातंय.

Aryan Khan : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण, आर्यन खानसह सहा जणांना पुराव्यांअभावी क्लीन चीट
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीन चीट
Image Credit source: Tv9
Follow us on

नवी दिल्ली : कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपी असलेला आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)ला एनसीबी (NCB)कडून आज क्लीन चीट (Clean Cheat) देण्यात आली. आर्यन विरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याने त्याला क्लीन चीट देण्यात आली. एनसीबीने आज कोर्टात सहा हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चीट मिळाली आहे. त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा आधी करण्यात आला होता. मात्र एनसीबीने आज आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नव्हतं. आर्यन खान विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. केवळ व्हॉट्स अप चॅटच्या आधारे आम्ही निर्णायक पुरावे (conclusive evidence) जोडू शकत नाही, असं एनसीबीने स्पष्ट केले आहे. व्हाट्स अॅपचॅटमध्येही आर्यनबाबत उल्लेख नाही. आर्यनसह सहा जणांकडे पुरावे न सापडल्याने त्यांना क्लीन चीट मिळाली आहे.

एनसीबीने एमबीपीटीच्या आंतरराष्ट्रीय टर्मीनलवर विक्रांत, इश्मीत, अरबाज, आर्यन आणि गोमित यांची झडती घेतली, तर काॅर्डेलिया क्रूजवर नुपूर, मोहक आणि मुनमुन यांची तपासणी करण्यात आली. आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे नार्कोटिक्स सापडले. मात्र मोहकविरोधात अन्य काही पुरावे सापडल्याने त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केल जातंय. आर्यनला क्लिन चीट मिळाली आहे. सुरुवातीला एनसीबीच्या मुंबईतील पथकाने या प्रकरणाचा तपास केला. नंतर दिल्लीतील एनसीबीच्या विशेष पथकाने तपास सुरु केला.

पुराव्याअभावी सहा जणांना क्लीन चीट

एनसीबीच्या वतीने दिल्लीत आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत आर्यन खानसह सहा जणांना क्लीन चीट दिल्याची माहिती दिली. सुरुवातीला, या प्रकरणाचा तपास एनसीबी मुंबईने केला होता. नंतर या प्रकरणाच्या तपासासाठी संजय कुमार सिंग, DDG (Ops) यांच्या नेतृत्वाखाली NCB मुख्यालय नवी दिल्लीकडून एक SIT गठीत करण्यात आली. याचा ताबा विशेष तपास पथकाने (SIT) 06 नोव्हेंबर 2021 रोजी घेतला. एसआयटीने केलेल्या तपासाच्या आधारे 14 जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पुरेशा पुराव्याअभावी उर्वरित 6 जणांना क्लीन चीट देण्यात आली, असे एनसीबीने नमूद केले.

हे सुद्धा वाचा

मुंबई एनसीबीने मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 2 ऑक्टोबर 2021 रोजी कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. सदर क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने ही कारवाई केली होती. कारवाई दरम्यान एनसीबी टीमने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मूनमून धामेचा या तिघांसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.  (Clean cheat from NCB to six including Aryan Khan in Cordelia Cruise Drugs case)