AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानला मारण्यासाठी शूटरची सुरक्षारक्षकाशी मैत्री… हत्येचा प्लॅन बिश्नोई गँगच्या शूटरनेच सांगितले

Salman Khan and lawrence bishnoi: मुंबई पोलिसांच्या चौकशीत सुक्खाने सांगितले की, सलमान खानच्या घरी एप्रिल महिन्यात ज्या लोकांनी गोळीबार केला होता, त्यांना सुक्खाने बंदूक दिली होती. या प्रकरणानंतर अजूनही सलमान खानला धमक्या मिळत आहेत.

सलमान खानला मारण्यासाठी शूटरची सुरक्षारक्षकाशी मैत्री... हत्येचा प्लॅन बिश्नोई गँगच्या शूटरनेच सांगितले
Salman Khan, lawrence bishnoi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 22, 2024 | 7:17 AM
Share

Salman Khan Conspiracy to kill: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संबंधित लोकांची धरपकड सुरु आहे. देशभरात लॉरेन्स बिश्नोई गँगचे असलेले नेटवर्क उद्धवस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. पोलिसांनी बिश्नाई गँगचा शूटर सुक्खा याला अटक केली आहे. या अटकेनंतर सुक्खा याने धक्कादायक माहिती दिली आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट बिश्नोई गँगने आखला होता. त्यासाठी शूटरने सलमान खानच्या सुरक्षा रक्षकाशी मैत्री केल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले. परंतु त्यांचा हा प्लॅन फेल झाला.

हरियाणामधील पानीपत येथून मुंबई पोलिसांनी सुक्खा याला अटक केली. सुक्खाने 2022 मध्ये मुंबईतील सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाउसमध्ये रेकी केली होती. तोच सलमान खान याच्यावर हल्ला करणार होता. परंतु त्याचा प्लॅन फेल झाला. रेकी करण्यासाठी सुक्खाने सलमान खानच्या सुरक्षारक्षकाशी मैत्री केली होती.

तो प्लॅन झाला फेल

मुंबई पोलिसांनी जून 2024 मध्ये सलमान खान याच्यावर नवी मुंबईतील पनवेल येथील फॉर्म हाऊसच्या मार्गावर हल्ला होणार असल्याचा दावा केला होता. परंतु शूटरचा तो प्लॅन फेल झाला. यापूर्वी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग होता.

असे केले सुक्खा याला अटक

सुक्खा याला अटक हरियाणातील पानीपतमधून करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांना टीप मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने पानीपतमधील एका हॉटेलमध्ये त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केले त्यावेळी त्याने मद्यपान केले होते. तो आपला नाव सुद्धा सांगू शकत नव्हता. तसेच ओळख लपवण्यासाठी दाढी वाढवली होती. परंतु पोलीस रेकॉर्डमध्ये असलेल्या फोटोमुळे त्याला अटक करता आली.

सुक्खानेच दिली होती बंदूक

चौकशीत सुक्खाने सांगितले की, सलमान खानच्या घरी एप्रिल महिन्यात ज्या लोकांनी गोळीबार केला होता, त्यांना सुक्खाने बंदूक दिली होती. या प्रकरणानंतर अजूनही सलमान खानला धमक्या मिळत आहेत.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!