दिरानेच गरोदर वहिनीचा गळा घोटला! कुर्ल्यातील धक्कादायक हत्याकांड, 24 तासांत आरोपी गजाआड

| Updated on: Apr 29, 2022 | 6:45 AM

Kurla Murder Case : अर्जुन दुपारी संजयच्या घरी आला. काही वेळानं निघूनही गेला. अर्जुन निघून गेल्यानंतर कोमल घरातून बाहेरच आलेली नव्हती.

दिरानेच गरोदर वहिनीचा गळा घोटला! कुर्ल्यातील धक्कादायक हत्याकांड, 24 तासांत आरोपी गजाआड
खळबळजनक हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : कुर्ल्यातील परिसर एका गर्भवती महिलेच्या हत्येनं (Murder of Pregnant Women) हादरुन गेलाय. या गरोदर महिलेच्या दिरानेच तिची हत्या केली आहे. या मध्ये महिलेसह तिच्या पोटातील बाळाचाही अंत झालाय. दरम्यान, पोलिसांनी (Kurla Police) या हत्याकांडप्रकरणी महिलेच्या दिराला अटक केली आहे. चोवीस तासांच्या आतच पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतलंय. वहिनीच्या प्रेमात बुडालेल्या दिराने तिची हत्या केल्याचं सांगितलं जातंय. वहिनीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दिरानेच तिची हत्या (Mumbai Murder case) केल्याचं घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गर्भवती महिला बाळंतपणासाठी आपल्या माहेरी जाणार होती. दिरानं तिला माहेर न जाण्यास विरोध केलेला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. हे भांडण टोकाला जाऊन महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलंय. बुधवारी (27 एप्रिल) ही घटना घडली. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जातेय. कुर्ला विभागाचे एसपी सुरेश जाधव यांनी या हत्याकांडाबाबत अधिक माहिती दिली आहे.

…अशी झाली हत्या!

संजय सोनकर हा त्याची पत्नी कोमलसोबत कुर्ल्यात राहात होता. संजय आणि त्याचा चुलत भाऊ अर्जुन दोघंही कॉटन ग्रीनच्या चहाच्या दुकानामध्ये काम करायचे आणि तिघेही एकत्र राहत होते. दरम्यान, अर्जुन हा आपल्याच चुलत भावाच्या पत्नीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.

कोमलच्या पोटात संजय मूल वाढत होतं. ती सात महिन्यांची गर्भवती होती. बुधवारी अर्जुन दुपारी संजयच्या घरी आला. काही वेळानं निघूनही गेला. अर्जुन निघून गेल्यानंतर कोमल घरातून बाहेरच आलेली नव्हती. शेजारच्या महिलांनी कोमला आवाज दिला. पण काहीच प्रतिसाद न आल्यानं शेजारचे घरात गेले, तेव्हा कोमल जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली. तिच्या तोंडातून रक्त येत होतं. आजूबाजूचे लोक हे चित्र पाहून हादरुन गेलं.

गरोदर महिलेसह तिच्या पोटातलं बाळाचाही मृत्यू

पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल तिच्या गावाला बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. पण कोमलच्या प्रेमात पडलेला दिर अर्जुनला तिला जाऊ द्यायचं नव्हतं. बुधवारी अर्जुन कोमलच्या घरी आला. घरी जाऊ न देण्यावरुन त्यांच्या कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर अर्जुननं गळा दाबून कोमलचा जीव घेतला. यात तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी हत्याकांडप्रकरणी आरोपी अर्जुनला चोवीस तासांच्या आतच ताब्यात घेतलंय. कोमलची हत्या केल्यानंतर अर्जुन पळ काढण्याच्या तयारी असल्याची टीप पोलिसांनी लागली होती. फरार होण्याच्या उद्देशानं अर्जुनने काम करत असलेल्या मालकाकडून पैसेही घेतले होते. पण पोलिसांनी तत्काळ पथकं रवाना करत चोवीस तासांच्या आतच अर्जुनला ताब्यात घेतंलय.