Ganesh Naik | नर्स किंवा शाळेचा युनिफॉर्म घालवून नाचायला लावायचे, गणेश नाईकांवर महिलेचे गंभीर आरोप

गणेश नाईक यांच्यासोबत 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. नेरुळ सेक्टर 16 मधील सी ब्रीज सोसायटीत जवळपास गेल्या 29 वर्षांपासून आपण एकत्र राहत असल्याचा महिलेचा दावा आहे.

Ganesh Naik | नर्स किंवा शाळेचा युनिफॉर्म घालवून नाचायला लावायचे, गणेश नाईकांवर महिलेचे गंभीर आरोप
गणेश नाईक
Image Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 9:42 AM

नवी मुंबई : भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. 1993 पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवत आणि जीवे मारण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. गणेश नाईक यांच्यासोबत 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहत असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.  नाईक आपल्या घरी आल्यावर नर्स किंवा शालेय विद्यार्थिनीचा गणवेश घालायला सांगायचे आणि नाचायला लावायचे. जर मी नकार दिला, तर मला बेदम मारहाण करायचे, असा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना केलेल्या अर्जात पीडितेने हा आरोप केल्याचं वृत्त ‘दै. सामना’ने दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

गणेश नाईक यांच्यासोबत 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. नेरुळ सेक्टर 16 मधील सी ब्रीज सोसायटीत जवळपास गेल्या 29 वर्षांपासून आपण एकत्र राहत असल्याचा महिलेचा दावा आहे. या संबंधांतून आपल्याला 15 वर्षांचा मुलगा झाल्याचंही महिलेचं म्हणणं आहे. तक्रारदार महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार आणि मुलासाठी पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा दावाही महिलेने केला आहे.

महिला आयोगाकडून दखल

संबंधित महिला आणि तिच्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या महिलेनं दाखल केलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. यावर योग्य कारवाई तात्काळ करुन त्याचा अहवाल 48 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत, असंही राज्य महिला आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे, गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनीही पीडित महिलेला त्यांच्यासोबत असलेले संबंध तोडून अन्यत्र निघून जाण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. अन्यथा महिलेला जीवे मारण्याबाबत धमकवण्यात आल्याची तक्रारही नेरुळ पोलिसांकडे करुनही कारवाई होत नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

महिला आयोगाचं ट्वीट पाहा

संबंधित बातम्या :

आमदार गणेश नाईकांची अडचण, महिलेचा लिव्ह इनचा आरोप, मुलगा असल्याचाही दावा, महिला आयोगाचे चौकशीचे आदेश