AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV VIDEO | लादीवरुन घसरुन पडल्याने शेजाऱ्यांमध्ये वाद, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

मुंबईजवळच्या वसईमधील गोगलेवाडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. लिओनात परेरा आणि फ्रान्सिस या दोन शेजाऱ्यांमध्ये हा वाद झडल्याचे समोर आले आहे.

CCTV VIDEO | लादीवरुन घसरुन पडल्याने शेजाऱ्यांमध्ये वाद, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न
वसईत लादीवरुन शेजाऱ्यांमध्ये राडा
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 7:50 AM
Share

वसई : घराच्या समोर लावलेल्या लादीवरुन दोघा शेजाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला. दोन शेजाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईजवळच्या वसईमधील गोगलेवाडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. लिओनात परेरा आणि फ्रान्सिस या दोन शेजाऱ्यांमध्ये हा वाद झडल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

लिओनात परेरा हे समोर लावलेल्या लादीवरुन घसरुन पडले. त्यामुळे त्यांनी कुदळ घेऊन थेट लादी फोडण्याचा प्रयत्न केला. पण शेजारी फ्रान्सिस याने त्यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्हिडीओ काढू नकोस, असं सांगत असतानाच लिओनात परेरा हे पुन्हा पाय घसरुन पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत.

सुदैवाने त्यांना गंभीर जखमी झाली नसल्याने ते सुखरूप आहेत. पण छोटासा वाद ही गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरु शकतो, हे या सीसीटीव्हीवरुन समोर आले आहे.

पाहा व्हिडीओ :

शेजाऱ्याशी वाद, बाळाची हत्या

दुसरीकडे, 18 महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या टँकमध्ये बुडवून ठार मारल्याप्रकरणी हरियाणातील 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर सुमारे सहा महिन्यांनी आरोपीला अटक करण्यात आली. शेजारी राहणाऱ्या बाळाच्या वडिलांसोबत 50 रुपयांवरुन भांडण झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून, सूड उगवण्यासाठी चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली होती. 22 वर्षीय आरोपी नरेश बेरोजगार आहे. हरियाणाच्या फरिदाबाद सेक्टर 56 मध्ये तो राहतो. नरेश हा दारुच्या आहारी गेल्याचं म्हटलं जातं. नरेशने आपल्या शेजाऱ्याच्या शेजाऱ्याच्या 8 वर्षांच्या मुलीच्या हातातून 50 रुपये हिसकावले होते. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

टँकमध्ये बुडवून ठार मारलं

वादानंतर नरेशचे आपल्या शेजाऱ्यासोबत वारंवार खटके उडायचे. 5 फेब्रुवारी रोजी नरेशने आपल्या शेजाऱ्याच्या 18 महिन्यांच्या मुलाला एकटं खेळताना पाहिलं. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून त्याने बाळाला उचलून आपल्या घरात नेलं. यानंतर नरेशने चिमुकल्याला पाण्याने भरलेल्या टँकमध्ये बुडवून ठार मारलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने टँकचे तोंड वायरने बंद केलं होतं. गेले जवळपास सहा महिने या हत्येला वाचा न फुटल्यामुळे नरेश निर्धास्त झाला होता, मात्र खून पचल्याच्या आवेशात असतानाच त्याचं बिंग फुटलं आणि त्याला बेड्या पडल्या.

संबंधित बातम्या :

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

शेजाऱ्याशी 50 रुपयांवरुन वाद, धडा शिकवण्यासाठी 22 वर्षीय तरुणाने बाळाला टँकमध्ये बुडवलं

क्राईम शो पाहून चिमुरडी म्हणालेली माझ्यावरही लैंगिक अत्याचार, आता पाच वर्षांनी 55 वर्षांचा शेजारी निर्दोष सुटला

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.