शेजाऱ्याशी 50 रुपयांवरुन वाद, धडा शिकवण्यासाठी 22 वर्षीय तरुणाने बाळाला टँकमध्ये बुडवलं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 16, 2021 | 2:54 PM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली. 22 वर्षीय आरोपी नरेश बेरोजगार आहे. हरियाणाच्या फरिदाबाद सेक्टर 56 मध्ये तो राहतो. नरेश हा दारुच्या आहारी गेल्याचं म्हटलं जातं.

शेजाऱ्याशी 50 रुपयांवरुन वाद, धडा शिकवण्यासाठी 22 वर्षीय तरुणाने बाळाला टँकमध्ये बुडवलं
दीड वर्षांच्या बाळाची पाण्यात बुडवून हत्या

गुरुग्राम : 18 महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या टँकमध्ये बुडवून ठार मारल्याप्रकरणी हरियाणातील 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर सुमारे सहा महिन्यांनी आरोपीला अटक करण्यात आली. शेजारी राहणाऱ्या बाळाच्या वडिलांसोबत 50 रुपयांवरुन भांडण झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून, सूड उगवण्यासाठी चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली. 22 वर्षीय आरोपी नरेश बेरोजगार आहे. हरियाणाच्या फरिदाबाद सेक्टर 56 मध्ये तो राहतो. नरेश हा दारुच्या आहारी गेल्याचं म्हटलं जातं. नरेशने आपल्या शेजाऱ्याच्या शेजाऱ्याच्या 8 वर्षांच्या मुलीच्या हातातून 50 रुपये हिसकावले होते. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

टँकमध्ये बुडवून ठार मारलं

वादानंतर नरेशचे आपल्या शेजाऱ्यासोबत वारंवार खटके उडायचे. 5 फेब्रुवारी रोजी नरेशने आपल्या शेजाऱ्याच्या 18 महिन्यांच्या मुलाला एकटं खेळताना पाहिलं. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून त्याने बाळाला उचलून आपल्या घरात नेलं. यानंतर नरेशने चिमुकल्याला पाण्याने भरलेल्या टँकमध्ये बुडवून ठार मारलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने टँकचे तोंड वायरने बंद केलं होतं. गेले जवळपास सहा महिने या हत्येला वाचा न फुटल्यामुळे नरेश निर्धास्त झाला होता, मात्र खून पचल्याच्या आवेशात असतानाच त्याचं बिंग फुटलं आणि त्याला बेड्या पडल्या.

मध्य प्रदेशात मुलीकडून वडिलांची हत्या

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात धुमसत होता.

संबंधित बातम्या :

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

नाका-तोंडात मिरचीपूड भरुन गळा दाबला, व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणात 42 वर्षीय महिला ‘अशी’ सापडली

प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांचा मुलीनेच काटा काढला, बॉयफ्रेण्डच्या मित्रामार्फत खून

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI