नाका-तोंडात मिरचीपूड भरुन गळा दाबला, व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणात 42 वर्षीय महिला ‘अशी’ सापडली

मंडप सजावटीचा व्यवसाय करणाऱ्या बाळाराम पाटील यांचा मृतदेह 13 ऑगस्ट रोजी पनवेलमधील ओवळे गावात नंदा ठाकूरच्या घरी सापडला होता. दुपट्ट्याने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली होती.

नाका-तोंडात मिरचीपूड भरुन गळा दाबला, व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणात 42 वर्षीय महिला 'अशी' सापडली
प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 12:49 PM

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील बेलवली गावातील 60 वर्षीय रहिवासी बाळाराम पाटील यांच्या खून प्रकरणाचा पनवेल शहर पोलिसांनी छडा लावला. गुन्हा दाखल केल्याच्या 48 तासांच्या आतच आरोपी नंदा ठाकूर (42) आणि तिचा सहकारी मंगेश खेत्री यांना अटक करण्यात आली. बाळाराम पाटील आणि आरोपी नंदा ठाकूर यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे बोलले जाते. नाका-तोंडात मिरचीपूड भरुन गळा दाबून हत्या केल्यानंतर नंदा ठाकूर पाटलांचे सोन्याचे दागिने लुटून पसार झाली होती.

काय आहे प्रकरण?

मंडप सजावटीचा व्यवसाय करणाऱ्या बाळाराम पाटील यांचा मृतदेह 13 ऑगस्ट रोजी पनवेलमधील ओवळे गावात नंदा ठाकूरच्या घरी सापडला होता. दुपट्ट्याने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांनी सांगितले की, आरोपी नंदा ठाकूर रविवारी बुलडाण्याहून परतली. सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथे ती बसमधून उतरली, तेव्हाच तिला अटक करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सोन्याचे दागिने लुटण्याचा कट

नंदाने मंगेश खेत्रीच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. 13 ऑगस्टच्या दुपारी, जेव्हा बाळाराम पाटील घरी आले, तेव्हा नंदाने मंगेश खेत्रीलाही बोलावले. पाटील यांचे सोन्याचे दागिने लुटण्याचा कट त्यांनी आखला होता. दोघांनी पाटील यांच्या तोंडात आणि नाकात मिरची पावडर भरली आणि दुपट्टा वापरुन त्यांचा गळा दाबला. त्यानंतर घराला कुलूप लावून दोघे पळून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नंदाच्या घरात पाटील मृतावस्थेत

पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय जोशी म्हणाले की, बाळाराम पाटील यांच्या मुलाने शुक्रवारी रात्री ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. दुसरीकडे, नंदा ठाकूरच्या मुलानेही पोलिसांना कळवले की आई कोणालाही न सांगता घर सोडून गेली. पोलिसांनी नंदा ठाकूरच्या घरी जाऊन दरवाजा तोडला, तेव्हा पाटील मृतावस्थेत आढळले आणि त्यांच्या गळ्याभोवती एक दुपट्टा अडकलेला होता.

लांडगे म्हणाले की, पोलिसांच्या पथकाने तांत्रिक कौशल्य वापरले आणि नंदा ठाकूर बुलडाणा येथे पळून गेल्याचे समजले. रविवारी सकाळी, जेव्हा ती कळंबोली येथे बसमधून उतरली, तेव्हा आमच्या पथकाने तिला पकडले. पाटील यांचे 17 तोळे सोन्याचे दागिने परत मिळाले आहेत.

संबंधित बातम्या :

प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांचा मुलीनेच काटा काढला, बॉयफ्रेण्डच्या मित्रामार्फत खून

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.