CCTV Video : चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

हा चोरटा आधी प्लॅटफॉर्मवर उभा राहून रेकी करायचा. रेकी केल्यानंतर चालत्या ट्रेनमधून चैन स्नॅचिंग करुन पळून जायचा. आरोपी आणखी कोणकोणत्या रेल्वे स्थानकात चोरी केली आहे. या गुन्ह्यात त्याचा आणखी कुणी साथीदार आहे का ? यासंदर्भात अधिक तपास बोरिवली जीआरपी पोलीस करत आहेत.

CCTV Video : चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक
चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 4:38 PM

मुंबई : मुंबईच्या चालत्या लोकल ट्रेनमध्ये चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करणाऱ्या चोरट्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा चोरटा अल्पवयीन असून गोरेगाव परिसरातून या चोरट्याला अटक केली आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाची चैन स्नॅचिंग करुन हा चोरटा पळून गेला होता. गोरेगाव रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात चोरटा पळून जात असताना कैद झाला होता. याबाबत बोरिवली जीआरपी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे.

प्लॅटफॉर्मवर उभा राहून रेकी करायचा चोरटा

बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव रेल्वे स्टेशनवर 31 मे 2022 रोजी पहाटे 5.18 मिनिटांनी सदर प्रवासी प्रवास करत होते. यावेळी ट्रेन सुरु झाल्यानंतर या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून पळून गेला. मात्र तो पळून जात असतानाच रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी बोरिवली जीआरपी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत, त्याआधारे चोरट्याचा शोध सुरु केला. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे गोरेगाव परिसरातून या चोरट्याला ताब्यात घेण्यात आले.

हा चोरटा आधी प्लॅटफॉर्मवर उभा राहून रेकी करायचा. रेकी केल्यानंतर चालत्या ट्रेनमधून चैन स्नॅचिंग करुन पळून जायचा. आरोपी आणखी कोणकोणत्या रेल्वे स्थानकात चोरी केली आहे. या गुन्ह्यात त्याचा आणखी कुणी साथीदार आहे का ? यासंदर्भात अधिक तपास बोरिवली जीआरपी पोलीस करत आहेत. (Minor thief arrested in goregoan for snatching chain in moving train)