ब्रेकिंग! मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या, 23व्या मजल्यावरुन मारली उडी

| Updated on: Oct 20, 2022 | 11:11 AM

32व्या मजल्यावरुन उडी मारुन बांधकाम व्यावसायिकाने का संपवलं आयुष्य? आत्महत्येचं कारण काय?

ब्रेकिंग! मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या, 23व्या मजल्यावरुन मारली उडी
मोठी बातमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या (Mumbai Builder Suicide) केली आहे. 23व्या मजल्यावरुन उडी मारुन बांधकाम व्यावसायिकाने जीव दिला. आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव पारस पोरवाल (Paras Porwal) असं आहे. बांधकाम क्षेत्रात (Real Estate Industry) या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. सध्या पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

पारस पोरवाल हे मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक प्रसिद्ध नाव होतं. ते दक्षिण मुंबईत बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडवलीय. भायखळातील इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन त्यांनी खाली उडी टाकली आणि आत्महत्या केली.

पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भायखळा पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्येआधी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती का? या अनुषंगाने आता पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

पोलिसांकडून पारस पोरवाल यांचा मृतदेह ताब्यात घेण्याचं काम सुरु आहे. त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केल्यानंतर अधिक बाबींचा उलगडा होईल. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी पंचनामा करण्याचं काम सुरु आहे. त्यांच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. भायखळा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पारस पोरवाल यांच्या आत्महत्येप्रकरणी प्राथमिक तपास सुरु असून अजूनतरी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणाच्या तपासातून आता नेमकी काय माहिती समोर येते, याकडे संपूर्ण बांधकाम क्षेत्राचं लक्ष लागलंय. पोरवाल कुटुंबीयांनाही पारस यांच्या आत्महत्येनं मोठा धक्का बसलाय.