Mumbai Crime | मानलेल्या भावाबरोबरच पत्नीच…, नवऱ्याची हादरवून सोडणारी कृती, चेंबूरमधील घटना

Mumbai Crime | ईश्वर बरोबर जे घडलं ते धक्कादायक. नात्यावरचा विश्वास उडेल अशी घटना. मुंबईत हा भयानक गुन्हा घडलाय. . प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन आरसीएफ पोलीस कसून तपास करत आहेत.

Mumbai Crime | मानलेल्या भावाबरोबरच पत्नीच..., नवऱ्याची हादरवून सोडणारी कृती, चेंबूरमधील घटना
Mumbai Chembur Crime
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 31, 2023 | 7:29 PM

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या चेंबूर भागात हा गुन्हा घडला. आरोपीने अत्यंत निदर्यतेने अल्पवयीन मुलाला संपवलं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावतना सुद्धा तितकीच क्रूरता दाखवली. आरोपीने अल्पवयीन मुलाच्या शरीराचे पाच तुकडे केले. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह बाहेर फेकला नाही, घरातच लपवून ठेवला. आरोपीने दोन दिवसानंतर आपल्या नातलगाला गुन्ह्याची कल्पना दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

आरोपीच नाव शफीक अहमद अब्दुल मलिक शेख असल्याच आरसीएफ पोलिसांनी सांगितलं. आरोपीने 17 वर्षाच्या ईश्वर भगवान आव्हाड नावाच्या युवकाची हत्या केली. धारदार शस्त्राने मृतदेहाचे पाच तुकडे करुन घरातच लपवले. जेणेकरुन कोणाला समजू नये. शफीक अहमदच्या मनात संशय होता की, त्याच्या पत्नीसोबत ईश्वरची जवळीक वाढत चाललीय. दोघांच अफेयर सुरु असल्याचा शफीकला संशय होता. त्यामुळे शफीक नाराज होता. त्यामुळे त्याने इतकं धक्कादायक टोकाच पाऊल उचललं.

भाऊ मानायची

शफीकची बायको ईश्वरला आपला भाऊ मानायची. त्याच्या बायकोच्या वडिलांनी मृत ईश्वरच पालन-पोषण केलं होतं. ईश्वर शफीकच्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. यावरुन त्याने ईश्वरला अनेकदा समजावल सुद्धा होतं. अनेकदा समजावूनही ईश्वर सुधारला नाही. त्यामुळे आपण हे पाऊल उचललं, असं शफीकने सांगितलं.

जर तुला माहित नाही, तर कोणाल माहित?

आरोपी शफीकला सासऱ्यांनी विचारलं की, ईश्वर कुठे आहे? तो तुझ्यासोबत गेला होता. मला माहित नाही, असं शफीकने उत्तर दिलं. शफीकच उत्तर ऐकून सासरे म्हणाले की, जर तुला माहित नाही, तर कोणाल माहित? काहीवेळाने शफीकने त्याच्या सासऱ्याला सांगितलं की, त्याने ईश्वरची हत्या केलीय. मृतदेह सुद्धा घरातच आहे.

मुंबईच्या आरसीएफ पोलिसांनी आरोपी शफीक अहमद विरुद्ध आयपीसीच्या कलम 302 आणि 201 कलमातंर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्याला अटक केली आहे. पोलिसांकडून शफीकची चौकशी सुरु आहे. प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कसून तपास करत आहेत.