सर्वसामान्यांना बोलण्यात गुंतवायचे, संधी साधून ऐवज पळवायचे, 24 लाखांचे हिरे घेऊन पळालेली टोळी अखेर जेरबंद

| Updated on: Jun 08, 2021 | 4:50 PM

मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने एका अशा गॅंगला बेड्या ठोकल्यात जी गँग बोलण्यात गुंतवून लोकांना लुबाडण्यात सराईत होती (Mumbai Police arrest gang of thieves who engaging people in conversation and stealing)

सर्वसामान्यांना बोलण्यात गुंतवायचे, संधी साधून ऐवज पळवायचे, 24 लाखांचे हिरे घेऊन पळालेली टोळी अखेर जेरबंद
मुंबईत हिरे व्यापाऱ्याचे लाखोंचे हिरे पळवणारी टोळी जेरबंद, भामटे सर्वसामान्यांना बोलण्यात गुंतवायचे, संधी साधून ऐवज पळवायचे
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने एका अशा गॅंगला बेड्या ठोकल्यात जी गँग बोलण्यात गुंतवून लोकांना लुबाडण्यात सराईत होती. एखाद्या व्यक्तीकडे मौल्यवान वस्तू किंवा पैसे आढळल्यास त्या व्यक्तीच्या भोवती ही गँग गर्दी करायची. नंतर बोलण्यात गुंतवून त्याचं लक्ष विचलित करायची. बोलताना संधी मिळताच ते समोरच्या व्यक्तीकडील मौल्यवान ऐवज लुबाडून लंपास व्हायचे (Mumbai Police arrest gang of thieves who engaging people in conversation and stealing).

नेमकं प्रकरण काय?

या गँगने एप्रिल महिन्यात बोरिवली परिसरात एका हिरे व्यापाऱ्याला लुबाडून त्याच्याकडचे 24 लाख रुपयांचे हिरे लंपास केले होते. त्यानंतर बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखासुद्धा करीत होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत या टोळीतील लोकांची ओळख पटवली आणि त्यानुसार त्यांचा शोध सुरू केला (Mumbai Police arrest gang of thieves who engaging people in conversation and stealing).

सहा जणांना बेड्या

तब्बल दोन महिन्यानंतर या टोळीतील 6 जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांना या कारवाईतून 24 लाख किमतीचे हिरे परत मिळवण्यात यश आलं. एप्रिल महिन्यात बोरिवली परिसरात हिरे व्यापारी सागर केतनभाई शाह हे बसमधून प्रवास करत असताना या गँगमधील आरोपींनी मोठ्या चालाखीने त्यांच्याकडची बॅग पळवली होती. मात्र अखेर ते आता पोलिसांच्या जाळ्यात आले.

पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?

पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही भामटे रिक्षातून मोठ्या घाईघाईने उतरून बसमध्ये चढताना दिसले. ही तीच लुबाडणारी टोळी आहे, असं पोलिसांच्या लक्षात आलं. ही टोळी पहिल्यांदा आजूबाजूला गर्दी करते आणि त्यानंतर बोलण्यात गुंतवून लक्ष विचलित करून लुबाडते, हाच या टोळीचा पेशा आहे. मात्र आता पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हेही वाचा : पोलीस असल्याची बतावणी, इगतपुरीत वृद्ध महिलेचे 1 लाख 70 हजारांचे दागिने घेऊन पोबारा