
मुंबई, मुंबईच्या एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape on Minor in Mumbai) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 3 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समाेर आली आहे. पोलिसांनी अटक करून तीनही अल्पवयीन आरोपींना डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठवले आहे. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
उर्वरित 3 प्रौढ आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते. याच महिन्यात मुंबईतून आणखी एका महिलेसोबत सामुहीक बलात्कार झाल्याची बातमी समोर आली होती. येथे एका 42 वर्षीय महिलेवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला हाेता. तिघांनी घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार केला हाेता. यादरम्यान आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने वार केले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटने चटकेही दिले हाेते.
नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड (NCRB) च्या 2018 ते 2020 च्या अहवालावर नजर टाकल्यास, बलात्कारानंतर खून आणि सामूहिक बलात्काराच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांकावर आहे. 2018 ते 2020 मध्ये, महिलांवरील अत्याचाराचे 3,1954 प्रकरणे नोंदवण्यात आली. बलात्कारानंतर खून आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश 4,9385 आकडेवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे.