मोठी बातमी ! मुंबईत दोन दहशतवाद्यांना अटक, जिहादी संघटनांच्या होते संपर्कात

| Updated on: Sep 03, 2022 | 7:11 PM

ऐन गणेशेत्सवात या दहशतवाद्यांकडून मोठे कट रचले जाण्याची शक्यता होती. त्यादरम्यान पश्चिम बंगाल पोलीस आणि एटीएस मुंबईने संयुक्त कारवाई करून दोघांना अटक करण्यात यश मिळवले.

मोठी बातमी ! मुंबईत दोन दहशतवाद्यांना अटक, जिहादी संघटनांच्या होते संपर्कात
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्र
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. याच उत्सवी वातावरणादरम्यान दहशतवादी कट-कारस्थान रचले असल्याचा दाट संशय आहे. पश्चिम बंगालच्या पोलिसांनी शनिवारी मुंबईतून दोन दहशतवाद्यांना अटक (Terrorist Arrest) केली असून ते दोघेही जिहादी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते. पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स (Special Task Force)च्या पथकाने एटीएस मुंबईच्या साहायाने ही अटकेची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसही अधिक सतर्क (Alert) झाले आहेत. मुंबईत आलेल्या या दोन दहशतवाद्यांनी गणेशोत्सवाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे का? याचाही पोलीस तपास करीत आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणांवरून घेतले ताब्यात

पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दिलेल्या माहितीनुसार, समीर हुसेन शेख आणि सद्दाम हुसैन खान अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघा दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली.

समीर हुसेन शेख याला डायमंड हार्बर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तर सद्दाम हुसेन खान याला मुंबईतील निर्मलनगर येथून ताब्यात घेण्यात आले. नंतर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

गणेशोत्सवात घातपाताचा कट रचला जाण्याची होती शक्यता

अटक केलेले दहशतवादी जिहादी संघटनांच्या नियमित संपर्कात होते. तसेच कट्टरतावाद्यांच्या कारवायांमध्ये अत्यंत सक्रिय होते. याबाबत पश्चिम बंगालच्या पोलिसांना गुप्त खबर मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे विशेष पथक मुंबईत आले होते. या पथकाने मुंबईतील एटीएसच्या मदतीने दोघांना अटक केली.

ऐन गणेशेत्सवात या दहशतवाद्यांकडून मोठे कट रचले जाण्याची शक्यता होती. त्यादरम्यान पश्चिम बंगाल पोलीस आणि एटीएस मुंबईने संयुक्त कारवाई करून दोघांना अटक करण्यात यश मिळवले.

STF पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. समीर हुसेन शेख आणि सद्दाम हुसेन खान हे बेकायदेशीर जिहादी दहशतवादी संघटना आणि अत्यंत कट्टरतावादी संघटनांच्या गुप्त कारवायांमध्ये नियमित सक्रिय आणि संपर्कात होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांना ट्रान्झिट रिमांडद्वारे कोलकात्यात नेले जाणार आहे.

मोबाइल फोनच्या टॉवर लोकेशन्सचा घेतला मागोवा आणि….

पश्चिम बंगालच्या एसटीएफ आणि गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) हे दोघेही बऱ्याच गुन्ह्यांच्या तपासात हवे होते. त्यांनी वारंवार लपण्याचे ठिकाण बदलले आणि एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पोबारा केला होता. शेवटी गुप्तहेरांनी त्यांच्या मोबाइल फोनच्या टॉवर लोकेशन्सचा मागोवा घेतला. त्यावेळी ते मुंबईत लपून बसल्याचे समजले.

पोलिसांनी ताबडतोब महाराष्ट्र एटीएसशी संपर्क साधला आणि शनिवारी एसटीएफ आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईतून दोघांना पकडण्यात आले. दोघांच्या ताब्यातून रोख रक्कम, लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले. (Two terrorists who were in contact with jihadi organizations were arrested in Mumbai)